Jump to content

अमागिरी किल्ला

अमागिरी किल्ला
天霧城
झेन्टसुजी, कागावा प्रांत, जपान
अमागिरी डोंगर
प्रकार डोंगरावरील किल्ला
जागेची माहिती
मालक कागावा कुळ, चोसोकाबे कुळ
परिस्थिती अवशेष
Site history
बांधले १३६४
याने बांधले कागावा कागेनोरी
उध्वस्त झालेले १५८५
किल्ल्यात ठेवलेली शिबंदी
मागील
कमांडर
कागावा युकिकागे, कागावा चिकाकाझु

अमागिरी किल्ला जपानच्या कागावाच्या झेन्टसुजी येथील किल्ला आहे.[][] अमागिरी किल्ल्याला राष्ट्रीय महत्व म्हणून नियुक्त केले गेले आहे.

इतिहास

कागावा कुळातील लोक ताडोत्सु किल्ला (मोतोदाईयामा किल्ला) राहण्यासाठी वापरत होते. परंतु तो किल्ला हल्ला झाल्यास प्रतिकार कारण्यास सक्षम नसल्यामुळे आधारासाठी अमागिरी किल्ला इ.स. १३६४ मध्ये बांधला होता.[][]

इ.स. १५८१ मध्ये, कागावा युकिकागे याने चोसोकाबे कुळाचा अधिकार मान्य केला. चोसोकाबे मोतोचिकाच्या दुसऱ्या मुलाला कागावा चिकाकाझुने दत्तक घेतले. हा किल्ला चोसोकाबे कुळाने सानुकि प्रांतातील एक लष्करी तळ म्हणून वापरला .[]

१५८५ मध्ये, टोयोटोमी हिदयोशीने शिकोकोला शह देण्यासाठी मोहीम सुरू केली. दोन महिन्यांच्या लढाईनंतर चासोकाबे मोटोचिका हा टोयोटोमी हिडयोशीला शरण गेला. यानंतर कागावा कुळ टोयोटोमी हिडयोशीद्वारे रद्द करण्यात आले. त्यानंतर कागावा चिकाकाझु ओको किल्ल्यावर परतले. यानंतर अमागिरी किल्ला वापरातून बाद झाला.[]

सध्याच्या साइटवर किल्ल्याचे थोडेसेच अवशेष शिल्लक आहेत. आता फक्त काही दगड आणि भिंती बघायला मिळतात.

हे सुद्धा पहा

ओको किल्ल्याजवळील कागावा चिकाकाझु ची कबर
  • जपानच्या ऐतिहासिक स्थळांची यादी (कागवा)

संदर्भ

  1. ^ a b "天霧城" (Japanese भाषेत). Zentsuji city official. 25 July 2019 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b "天霧城" (Japanese भाषेत). 攻城団. 25 July 2019 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "天霧城跡" (Japanese भाषेत). じゃらん. 25 July 2019 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "天霧城跡" (Japanese भाषेत). ニッポン城めぐり. 25 July 2019 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)