Jump to content

अमर अकबर अँथनी

अमर अकबर अँथनी
दिग्दर्शनमनमोहन देसाई
निर्मितीमनमोहन देसाई
प्रमुख कलाकारविनोद खन्ना
ऋषी कपूर
अमिताभ बच्चन
शबाना आझमी
नीतू सिंग
परवीन बाबी
निरुपा रॉय
प्राण
जीवन
छाया पीटर परेरा
गीतेआनंद बक्षी
संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल
पार्श्वगायनमोहम्मद रफी
किशोर कुमार
लता मंगेशकर
देश भारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २७ मे १९७७
आय.एम.डी.बी. वरील पान



अमर अकबर अँथनी हा १९७७ मधील भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शक व निर्माता मनमोहन देसाई आहेत. ह्यात विनोद खन्ना, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन, शबाना आझमी, नीतू सिंग, परवीन बाबी, निरूपा रॉय, प्राण आणि जीवन प्रमुख भूमिकेत आहेत.

कथानक

तीन भाऊ लहानपणी रॉबर्ट नावाच्या (जीवन) एका गुन्हेगारामुळे वेगळे होतात व त्यांना तीन वेगळ्या धर्मांची कुटुंबं दत्तक घेतात. बावीस वर्षांनंतर, ते वेगळ्या नाव व धर्मांचे दाखवले जातात; पहिला भाऊ अमर खन्ना (विनोद खन्ना) नावाचा हिंदु पोलीस अधिकारी बनतो, दुसरा भाऊ अकबर इलाहाबादी (ऋषी कपूर) नावाचा मुस्लिम कव्वाली गायक असतो, आणि तिसरा भाऊ अँथनी गोंजाल्विस (अमिताभ बच्चन) नावाचा ख्रिश्चन दारू विक्रेता असतो. ह्या तीन भावांची कशीतरी पुन्हा भेट होते व ते रॉबर्टकडून त्यांना वेगळं केल्याचा बदला घ्यायचा ठरवतात.

कलाकार

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • सर्वोत्तम अभिनेता - अमिताभ बच्चन
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - लक्ष्मीकांत प्यारेलाल