Jump to content

अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चन
जन्म ५ फेब्रुवारी, १९७६ (1976-02-05) (वय: ४८)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, निर्माता
कारकीर्दीचा काळ २००० - चालू
भाषाहिंदी
वडीलअमिताभ बच्चन
आई जया अमिताभ बच्चन
पत्नी
अपत्ये आराध्या बच्चन

अभिषेक बच्चन ( ५ फेब्रुवारी १९७६) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनजया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक अयशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ३ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

माजी मिस वर्ल्ड विजेती व बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनची पत्नी आहे. त्यांच्या जोडीला सिने-जगतात अभिवर्या ह्या टोपणनावाने ओळखले जाते.

चित्रपट कारकीर्द

वर्ष शीर्षक भूमिका
२००० रेफ्युजीरेफ्युजी
२००० ढाई अक्षर प्रेम केकरन खन्ना
२००० तेरा जादू चल गयाकबीर श्रीवास्तव
२००१ बस इतना सा ख्वाब हैसूरज श्रीवास्तव
२००२ हां मैने भी प्यार कियाशिव कपूर
२००२ शरारतराहुल खन्ना
२००२ ओम जय जगदीशजगदीश बत्रा
२००३ मुंबई से आया मेरा दोस्तअजान
२००३ मैं प्रेम की दिवानी हूंप्रेमकुमार
२००३ कुछना कहोराज
२००३ जमीनएसीपी जय
२००३ एल.ओ.सी. कारगिललेफ्टनंट विक्रम बात्रा
२००४ रनसिद्धार्थ (सिद्धू)
२००४ युवालल्लन सिंघ
२००४ धूमएसीपी जय दीक्षित
२००४ फिर मिलेंगेतरुण आनंद
२००४ नाचअभिनव
२००५ बंटी और बबलीराकेश त्रिवेदी / बंटी
२००५ सरकारशंकर नागरे
२००५ दसशशांक धीर
२००५ ब्लफमास्टररॉय कपूर
२००६ कभी अलविदाना कहनाऋषी तलवार
२००६ उमराव जाननवाब सुलतान
२००६ धूम २एसीपी जय दीक्षित
२००७ गुरूगुरूकांत देसाई
२००७ झूम बराबर झूमरिकी ठुकराल
२००७ सरकार राजशंकर नागरे
२००८ द्रोणाआदित्य / द्रोणा
२००८ दोस्तानासमीर
२००९ दिल्ली ६रोशन मेहरा
२००९ पाअमोल अत्रे
२०१० रावणबीरा मुंडा
२०१० खेलें हम जी जान सेसुराज्य सेन 
२०११ गेमनील मेनन
२०११ दम मारो दमएसीपी विष्णू कामथ
२०१२ प्लेयर्सचार्ली
२०१२ बोल बच्चनअब्बास अली
२०१३ धूम ३एसीपी जय दीक्षित
२०१४ हॅपी न्यू इयरनंदू भिडे / विकी ग्रोव्हर
२०१५ ऑल इज वेलइंदर भल्ला
२०१६ हाउसफुल्ल ३बंटी

चित्रदालन

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अभिषेक बच्चन चे पान (इंग्लिश मजकूर)