अभिव्यक्ती (त्रैमासिक)
अभिव्यक्ती हे नासिक येथून प्रकाशित होणारे मराठी त्रैमासिक होते. हे त्रैमासिक १९९५ साली सुरू झाले. हे त्रैमासिक अभिव्यक्ती (मीडिया फॉर डेव्हलपमेंट) या माध्यमविषयक बिगरसरकारी संस्थेचे प्रकाशन होते.
संजय संगवई हे पर्यायी पत्रकारितेचे पुरस्कर्ते या मासिकाचे पहिले संपादक होते.
त्रैमासिकाची भूमिका
हे मासिक ‘माध्यम आणि विकास” या प्रश्नाला मध्यवर्ती ठेवून सुरू करण्यात आले. १९९० च्या दशकात माध्यमांची चिकित्सा करणारे एकही प्रकाशन मराठीतून उपलब्ध नव्हते. त्यावेळी माध्यमे, कला, संस्कृती यांची गंभीर चिकित्सा करणे आणि कला, चित्रपट, नाटक, दूरदर्शन, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या इत्यादींना विकासविषयक माहिती देणे ही भूमिका या मासिकाची होती.
या त्रैमासिकाचे नाव “अभिव्यक्ती - माध्यम चर्चेचे मराठी त्रैमासिक’ असे करण्यात आले. हे नामकरण संजय संगवई यांनीच केले होते. जनसामान्यांमध्ये माध्यम विषयक जाणीवा निर्माण करणे, सामाजिक विकासाच्या संदर्भात माध्यमकर्मीना कर्तव्याची, बांधिलकीची जाणीव देणे आणि त्यांच्या अभिव्यक्ती व्यक्त करणे, ही कामे संजय संगवई यांनी त्यांच्या संपादकीयातून केली.
अंक संख्या
या मासिकाचे एकूण ७५ अंक प्रसिद्ध झाले. ते विविध विषयांना वाहिलेले आहेत. त्यातील अनेक अंक मध्यम क्षेत्रात खळबळजनक ठरले. या अंकावर वृत्तपत्र विद्या विभाग, कोल्हापूर विद्यापीठ, कोल्हापूर येथील एका विद्यार्थ्याने संशोधन प्रबंध लिहिला.[ दुजोरा हवा][ संदर्भ हवा ]
पत्ता
"अभिव्यक्ती "(मीडिया फॉर डेव्हलपमेंट), कल्याणीनगर, आनंदवल्ली शिवार, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३