अभिव्यक्तिस्वातंत्र्य
इतर सजीवांप्रमाणे किंबहुना इतर सजीवापेक्षा अधिक चांगल्या रितीने अभिव्यक्ती ही मनुष्य प्राण्याची नैसर्गिक गरज अथवा प्रेरणा आहे. जगात लोकशाही आणि स्वातंत्र्य बळकट करण्याकरिता झालेल्या विविध चळवळींमुळे, तसेच बौद्धिक व न्यायिक चिकित्सांमधून अभिव्यक्तीस्वातंत्र्यास मूलभूत स्वातंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. तसेच, या स्वातंत्र्याच्या व्याख्येच्या कक्षा अधिकाधिक विस्तारित ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचे महत्त्व भारतानेच नव्हे तर जागतिक स्तरावर मान्य केले गेले आहे.स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे कितीही गुणगान केले तरी इतर मूलभूत हक्कांप्रमाणेच अभिव्यक्तिस्वातंत्र्याससुद्धा कायद्याच्या मर्यादेशी आणि सांस्कृतिक पारंपरिक वातावरणाशी सामना करावयास लागतो.अभिव्यक्तिस्वातंत्र्या ने नियमबद्ध होणाऱ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा, त्याच्या विस्तारकक्षांचा व मर्यादांचा व्यक्ती, समूह, त्यांची स्थलकालसापेक्ष संस्कृती, इतर मूलभूत स्वातंत्र्यअधिकार, त्यांच्या हक्क-कर्तव्यांच्या संकल्पना आणि संबधित विविध कायदे यांवर परिणाम होत असतो.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा व्यक्तिगत स्वातंत्र्याप्रमाणेच लोकशाही मूल्यांवर आधारित मूलभूत मानवी अधिकार आहे. स्वतःस अभिव्यक्त करता येणे म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही स्वयंपूर्णतेसाठी किमान आवश्यकता असते. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विचार-स्वातंत्र्यासोबत घनिष्ठ नाते आहे.[१]
भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत सर्व भारतीय नागरिकांना वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्य असल्याचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ मध्ये या स्वातंत्र्याचा पुनरूच्चार केला आहे. योगायोग असा की, मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्राच्याही १९ व्या क्रमांकाच्या कलमात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे.
अभिव्यक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय
माध्यम कोणतेही असले तरी, अभिव्यक्तीस्वातंत्र्य या शब्दाने केवळ बोलण्याचेच नव्हे, तर माहिती किंवा कल्पना हवी असणे, मिळवणे, आणि देणे यांचे स्वातंत्र्यही अभिप्रेत होते. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र कलम १९ अनुसार प्रत्येकास मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता मत बाळगण्याच्या स्वातंत्र्याचा, तसेच कोणत्याही माध्यमातून सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टी मिळवणे व इतरांना देणे यासंबधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.
स्वातंत्र्य म्हणजे व्यक्त होण्याची मुक्तता असणं.कुठलिही संवेदना व्यक्त करताना त्यावर बंधन नसणं म्हणजे स्वातंत्र्य.हवं तस जगता येण म्हणजे स्वातंत्र्य.
महत्त्व
शासन,धर्मसंस्था आणि समाज/ वेगवेगळे समाजघटक वेळोवेळी आपली सत्ता अथवा प्राप्तस्थानाचे निरंकुशत्व जपण्याकरिता विरोधी विचारांवर नियंत्रण मिळवण्याकरिता अथवा विरोधीविचार नामशेष करण्याकरिता अथवा तो सामान्यजनांपर्यंत न पोहोचु देण्याच्या दृष्टीने पहिला बळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा घेण्याचा प्रयत्न करतात.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जनसंवाद माध्यमांमध्ये जी क्रांती झाली इंटरनेट,मोबाईल इत्यादी साधने सर्वसामान्य जनतेस सहजतेने माहितीची देवाण घेवाण करू देऊ लागली त्यामुळे शासनप्रणाली कायद्दांचा उपयोगकरून ही नवी माध्यमेसुद्धा कशी नियंत्रणाखाली येतील हे पाहू लागल्या.
चीन सारख्या बऱ्याच देशांमध्ये अजूनही अभिव्यक्तीस्वातंत्र्य "लोकशाही" हे शब्दसुद्धा इमेल इंटरनेट मोबाईल या साधनांद्वारे प्रसारीत होऊनयेत याकरिता सर्व आटापिटा केला जातो.भारतासारख्या लोकशाही देशातसुद्धा मागच्यादाराने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कायद्द्यांचे वेळोवेळी मसुदे बनवले जातात असे आढळते,परंतु लोकशाहीतील जागरूक आधारस्तंभांमुळे आणि न्यायसंस्थेमुळे त्यातील बहुतांश निरंकुश अंकुश लावू इच्छिणाऱ्या मसुद्दांना आणि कायद्दांना वेगवेगळ्यास्तरावर वेळीच रोखून धरले जाते.
ढोबळ मानाने अभिव्यक्तिस्वातंत्र्याने साध्य विशेष उद्दीष्ट्ये
- स्व-परिपूर्ती[विशिष्ट अर्थ पहा] प्राप्त/साध्य करण्यास व्यक्तींना सहाय्य मिळते
- सत्य शोधनात मदत होते
- व्यक्तीची निर्णय प्रक्रीयेत सहभाग सक्षम करते
- स्थैर्य आणि समाज सुधारणेत समतोल साधणारा mechanism उपलब्ध करते
- समाजाचे सर्व घटक स्वतःच्या विश्वासांना अभिभूत करू शकतात आणि त्यांबद्दल इतरांशी मुक्तपणे संवाद साधु शकतात
ऐतिहासिक, राजकीय, न्यायिक, सांस्कृतिक व वैचारिक दृष्टिकोण
प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात असलेली काही तत्कालीन मूल्ये आधुनिक काळात, शांततामयपद्धतीने व्यक्त झालेल्या सत्याच्या आग्रहातून, स्वीकारार्ह नसली तरीही, प्राचीन भारतीय संस्कृतीत तत्त्वज्ञांनी आणि राज्यकर्त्यांनी वेळोवेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य परोक्ष अथवा अपरोक्षरीत्या जपण्याचे प्रयत्न केल्याचे आढळून येते. जैन, बौद्ध आणि वैदिक/अवैदिक विचारप्रणालीत विचारांचे आदानप्रदान बऱ्यापैकी मुक्तपणे होत असावे.[ संदर्भ हवा ]
मध्ययुगीन काळात या स्वातंत्र्यावर स्त्री स्वातंत्र्यावर, अस्पृश्यता, जातीय उतरंडी व धर्मांधतेने मर्यादा आणल्याचेही लक्षात येते. ब्रिटिशोत्तर काळापासून युरोपीय प्रागतिक लोकशाहीमूल्यांशी परिचय होऊ लागल्यानंतर विविध सामाजिक आणि राजकीय सुधारकांनी अभिव्यक्ती आणि इतर मूलभूत स्वातंत्र्ये मिळवण्याकरिता विविध चळवळी आणि संघर्ष केले. याचा परिपाक म्हणून ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेत इतर मूलभूत हक्कांसोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचाही समावेश केला.
अभिव्यक्त होण्याकरिता लागणाऱ्या स्वातंत्र्याचे वर्णन रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या Where the Mind is Without Fear या काव्यात केले आहे.
Where the mind is without fear and the head is held high;
Where knowledge is free;
Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls;
Where words come out from the depth of truth;
Where tireless striving stretches its arms towards perfection:
Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit;
Where the mind is lead forward by thee into ever-widening thought and action—Into that heaven of freedom, my Father, let my country awake.
अधिकारप्राप्तीचा इतिहास
प्रदीर्घ मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात, दोन विचाधारांमध्ये एकमेकांना विरोधी भासणाऱ्या शक्ती उदयास आल्याचे कित्येकदा आढळून येते. लिखित माध्यमांतून कल्पना आणि मते व्यक्त करण्याची गरज आणि या उलट, मुक्तपणे अभिव्यक्त होण्यावर बंधने घालण्याची आवश्यकता अनेकांनी व्यक्त केली आहे. ग्रीक महाकाव्याचे कवी होमर ( इसपूर्व नववे किंवा आठवे शतक) यांनी मुक्त अभिव्यक्तीचे समर्थन केले, पण अथेन्सचे पहिले महत्त्वपूर्ण कायदेतज्ज्ञ सोलोन (इसपूर्व ६३०-५६०) यांनी "जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या विरुद्ध वाईट बोलण्यावर" बंदी घातली होती. अथेन्स लोकशाहीतील नेता, पेरिकल्सने (Pericles) अथेन्सचे राज्य आणि त्यांचे विरोधक स्पार्टाचे नागर-राज्य यांतील मूलभूत फरक म्हणजे भाषणस्वांतंत्र्य होय असे स्पष्ट म्हणले आहे. तरीसुद्धा, पेलोपोनेशियन (Peloponnesian) युद्धांनतर, अथेन्स सभागृहाने सॉक्रेटिसला अनोळखी देवांविषयी भाषणे देण्याबद्दल, तसेच अधिकारीवर्गांना प्रश्न विचारण्यास तरुणांना प्रोत्साहन देऊन भ्रष्ट केल्याबद्दल विषप्राशन करण्याची आज्ञा फर्मावली होती.[३]
परीघ
भाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीस स्वतःची मते आणि त्यांवरील विश्वास बोलून व्यक्त केलेल्या शब्दातून, लेखनामधून, छापील मजकुरातून, चित्रांद्वारा किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार. अभिव्यक्तींत, एखादी संकल्पना संवादी माध्यमातून, गीत गायनातून, खाणाखुणांनी तसेच अभिनयादी दृश्य representation [मराठी शब्द सुचवा], माध्यमातून व्यक्त करण्याचा अंतर्भाव होतो. यांत छपाईसुद्धा अभिप्रेत असल्यामुळे वृत्तमाध्यमांचे स्वातंत्र्याचाही या प्रवर्गात समावेश होतो. संकल्पनांची मुक्त प्रसिद्धी propagation [मराठी शब्द सुचवा] हे आवश्यक उद्दिष्ट व्यासपीठांवरून अथवा वृत्त माध्यमांतून साधता आले पाहिजे. वितरणाच्या स्वातंत्र्याने ही प्रसिद्धी propagation [मराठी शब्द सुचवा] सुरक्षित होते. प्रकाशनाचे जसे स्वातंत्र्य हवे तसे ते वितरित करण्याची मुक्तता हवी, म्हणूनच वितरणाशिवाय प्रकाशनाचे फारसे मूल्य उरत नाही. भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याने केवळ स्वतःच्याच मतांचे प्रसारण करता येते असे नाही, तर इतरांच्याही मतांचे प्रसारण आणि प्रसिद्धी करता येते; असे नसते तर वृत्तमाध्यमांचे स्वातंत्र्य अस्तित्वात आले नसते.
भाषण आणि अभिक्तिस्वातंत्र्याच्या परिघाची माहिती देताना सर्वोच्च न्यायालयाने "भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यात एखाद्याचे दृष्टिकोण बोलून, लिहून अथवा दृक् आणि ध्वनी माध्यमातून वितरित करण्याच्या अधिकारांचा ढोबळ मानाने समावेश होतो" असे म्हणले आहे.
Freedom of Speech and expression means the right to express one's own convictions and opinions freely by words of mouth, writing, printing, pictures or any other mode. It thus includes the expression of one's idea through any communicable medium or visible representation, such as gesture, signs, and the like. This expression connotes also publication and thus the freedom of press is included in this category. Free propagation of ideas is the necessary objective and this may be done on the platform or through the press. This propagation of ideas is secured by freedom of circulation. Liberty of circulation is essential to that freedom as the liberty of publication. Indeed, without circulation the publication would be of little value. The freedom of speech and expression includes liberty to propagate not one's views only. It also includes the right to propagate or publish the views of other people; otherwise this freedom would not include the freedom of press.[४]
Explaining the scope of freedom of speech and expression Supreme Court has said that the words "freedom of speech and expression" must be broadly constructed to include the freedom to circulate one's views by words of mouth or in writing or through audiovisual instrumentalities.[४]
अभिव्यक्तीची माध्यमे
व्यक्ती ज्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करू शकतात अशा माध्यमांची संख्या बरीच आहे. भाषण, लेखन व दृक्श्राव्य कला इत्यादींचे उपप्रकार मोजल्यास ही संख्या अगणनीय होऊ शकते. भाषण, लेखन, वृत्तमाध्यमे, चित्र, व्यंगचित्र, काव्य..... या कलाक्षेत्रांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्यास वेळोवेळी मोठा संघर्ष आणि मोठे योगदान केले आहे.
अभिव्यक्ती, प्रताधिकार आणि बौद्धिक संपदा यांचा परस्पर संबंध
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून तयार झालेले कायदे माणसाचे व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिमत्व अबाधित राखतात. हे कायदे माणसाची अभिव्यक्ती तसेच त्याचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्य आवश्यक तितके खासगी ठेवणाऱ्या अधिकारांची जोपासना करतानाही आढळतात.
त्याही पलीकडे जाऊन, हे कायदे व्यक्तींच्या अधिकारांची जोपासना करताना नवनिर्मितीच्या नव्या आविष्कारांना प्रोत्साहन देतात. कोणत्याही माध्यमातून अभिव्यक्त होताना व्यक्तींनी निर्माण केलेल्या/झालेल्या कृतीस, वक्तव्यास प्रताधिकार आणि बौद्धिक संपदा कायद्यांचे मर्यादित संरक्षण प्राप्त होते. व त्यामुळे शक्य झाल्यास निर्मात्यास आर्थिकप्राप्ती होऊ शकते अथवा जाणीवपूर्वक स्वतःहून असे स्वतःचे लेखन/कलाकृती तो प्रताधिकारमुक्त म्हणून जाहीरकरू शकतो.
एखाद्या व्यक्तीने केलेले भाषण/लेखन/कलाकृती हे सामान्यतः त्या व्यक्तीची मालमत्ता असते, ऐकणारा श्रोता तीच ऐकलेली गोष्ट जशीच्या तशी पुनःप्रसारित करावयाची असल्यास त्या व्यक्तीच्या संमतीनेच करू शकतो; पण त्याच वेळी त्या पासून प्रेरणा घेऊन केलेली नवनिर्मितीवर नवी निर्मिती करणाऱ्या व्यक्तीचा प्रताधिकार असतो (अर्थात येथे आधीच्या कलाकृतीची नक्कल न करण्याची काळजी कटाक्षाने घेणे अभिप्रेत असते) , आधीच्या व्यक्तीचे प्रताधिकार कुठे संपतात आणि नंतरच्या व्यक्तीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमके कुठे सुरू होते यातील रेषा काही वेळा पुसट असतात.सोबत आधीच्या व्यक्तीच्या मांडणीशी (विचारांशी नव्हे) मूलभूत फरक असल्यास ती स्वतःची बौद्धिक संपत्ती म्हणून हक्कसुद्धा दाखवणे सोपे होते .
अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि शासन
जर्मन विकिपीडीयातून मशिन ट्रान्सलेशननेघेतले भाषांतर बाकी Freedom of expression is a human right and is in a constitution as one against the state violence directed fundamental right guaranteed to ensure that the public opinion and the related discussion of government and legislation affecting or even prohibited. Closely related to freedom of expression guarantees the freedom of information access to important information without having a critical opinion would not be possible, the prohibition of censorship prevents the expression and control of information by Government agencies. Unlike a dictatorship, control of information are the state power in a democracy by the means of preventive censorship is strictly prohibited.
भारतीय राज्यघटनेतील कलम १९.
भारतीय संविधान कलम १९ (१) मध्ये दिलेले आहेत. त्यात
(अ) वाणी (भाषण) व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य,
(ब) शांततेने व निःशस्त्र एकत्र जमणे,
(क) संघटना स्थापणे,
(ड) देशातील कुठच्याही भागात मुक्त संचार करणे,
(इ) देशातील कुठच्याही भागात राहणे व स्थायिक होणे आणि
(ग) कुठचाही व्यवसाय, धंदा, व्यापार वा उद्योग करणे यांचा समावेश आहे.
Nothing in sub-clause (a) of clause (1) shall affect the operation of any existing law, or prevent the State from making any law, in so far as such law imposes reasonable restrictions on the exercise of the right conferred by the said sub-clause in the interests of the sovereignty and integrity of India, the security of the State, friendly relations with foreign States, public order, decency or morality, or in relation to contempt of court, defamation or incitement to an offence. All citizens shall have the right -
- All citizens shall have the right -
- to freedom of speech and expression;
- to assemble peaceably and without arms;
- to form associations or unions;
- to move freely throughout the territory of India;
- to reside and settle in any part of the territory of India; and*** (repealed)
- to practice any profession, or to carry on any occupation, trade or business.
घटनात्मक न्यायसंस्थेचे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या संबधाने निर्णय आणि निवाडे
भारतीय राज्यघटनेत अभव्यिक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता, राष्ट्राची सुरक्षितता, इतर देशांशी असलेले मैत्रीचे संबंध, कायदा व सुव्यवस्था, नैतिकता, सभ्यता या कारणांसाठी तसेच व्यक्तीची बेअब्रू व न्यायालयाचा अवमान यांचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारला या हक्कावर कायद्याने वाजवी मर्यादा घालता येतात. मर्यादा वाजवी आहेत की नाही हे न्यायालयांनी ठरवायचे असते.
दृश्य माध्यमांवरील पूर्वनियंत्रण (सेन्सॉरशिप) ही अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील मर्यादा वाजवी असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने इ.स. १९७० साली के.ए. अब्बास विरुद्ध भारत सरकार या खटल्याच्या निर्णयात दिले होते.
माफक बंधने
अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांत असले तरी, घटनेने १९ व्या कलमानुसार नागरिकांना बहाल केलेले भाषण, माहिती व अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे अनियंत्रित व निरंकुश नाहीत.
देशाचे सार्वभौमत्व , राष्ट्रीय एकात्मता , राष्ट्रीय सुरक्षा , मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय संबध, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था , सभ्यता, नैतिकता यांपैकी एखाद्या गोष्टीचा भंग होत असल्यास, किंवा न्यायालयाची अवमानना , बदनामी , गुन्ह्यास प्रोत्साहन होत असल्यास, व्यक्ती किंवा समूहाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूलभूत अधिकारांवर योग्य व वाजवी मर्यादा आणणारे कायदे राज्याला करता येतात. अशा प्रकारे, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर शासन माफक बंधने घालू शकते.
या अधिकारांचा उल्लेख बऱ्याचवेळा 'घटनेने बहाल केलेली स्वातंत्र्ये' असा केला जात असला तरी प्रत्यक्षात स्वातंत्र्य हा शब्द फक्त १९ (१) (अ) मध्येच योजिलेला आहे, (ब) ते (ग) मधील अधिकारांसाठी तो वापरलेला नाही. त्याचप्रमाणे 'देशाच्या कुठच्याही भागात' हा उल्लेख फक्त (ड) व (इ) मधील अधिकारांसाठीच केलेला आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कलम १९ (२) ते १९ (६) मध्ये वरील सर्व मूलभूत अधिकारांवर शासन कोणत्या कारणांसाठी वाजवी बंधने घालू शकेल याचा तपशील दिलेला आहे. त्यानुसार संचार करणे, निवास करणे, स्थायिक होणे व व्यवसाय, धंदा, व्यापार व उद्योग यावर सामान्य जनतेच्या हितासाठी शासन वाजवी बंधने घालू शकते अशी तरतूद आहे. कलम बारामधील शासनाच्या व्याख्येत केंद सरकार व संसद यांच्याबरोबर राज्य सरकारे, राज्य विधिमंडळे आणि स्थानिक पातळीवरील शासन संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मते कायदा व नियम करण्याचे अधिकार असलेल्या ग्रामपंचायतीसुद्धा अशी वाजवी बंधने घालू शकतात. न्यायालयीन निवाड्यानुसार सामान्य जनतेचे हित एका क्षेत्रापुरते किंवा काही व्यक्तींचेही असू शकते.[५]
अयोग्य बंधने, बंधनांचा अतिरेक, सामाजिक दबाव आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कुचंबणा
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीचेही स्तर असतात. व्यक्तिगत स्तरावर म्हणजे पती-पत्नी, आई-बाप आणि मुले, विद्यार्थी-शिक्षक यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीचे प्रयोग घरोघरी चालूच असतात.दुसरा स्तर असतो व्यक्तीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर समूह गदा आणतो तो.राज्यसत्तेने (स्टेट कन्ट्रोल्ड) अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे नियंत्रण करणे हा तिसरा स्तर.[६]
व्यक्तीचे स्वतःचे आर्थिक अथवा इतर हितसंबंध, सुरक्षीतता दुखावले जाण्याची भीती आणि समूहातील सुरक्षा भावनाही बऱ्याचदा व्यक्तींना मुक्तपणे अभिव्यक्त होण्यापासून परावृत्त करत असते.
ज्या तीन बाबींच्या नावाखाली शासन व्यवस्था सहसा नियंत्रण आणु पहाते त्या सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था , सभ्यता, नैतिकता बाबी सापेक्ष असतात.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईत आपण काय मांडत आहोत हे लक्षात घेऊन आपल्या कलाकृतीशी त्या व्यक्तीने ठाम राहिले पाहिजे. त्याबाबत तडजोड करता कामा नये. लोकशाहीत प्रत्येक बाबीचा आदर केला गेला पाहिजे. कलावंत हे इतिहास लिहीत असतात. कोणतीही गोष्ट निषिद्ध नाही. एखादी बाब पटली नाही तर ती नाकारा, पण त्याचा अनादर करू नये असे मत जब्बार पटेल व्यक्त करतात.[७]
जेव्हा अशी बंधने येतात तेव्हा भाषेला, साहित्याला, कलाकृतीला नवे धुमारे फुटतात.[८]
मानवाधिकारासंबधी आंतरराष्ट्रीय दस्तऐवज
- ह्या विभागातील काही भाग फ्रेंच विकिपीडीयातून गूगल मशिन ट्रान्सलेशन सहाय्याने इंग्रजीत अनुवादित करून घेतल्यामुळे तो इंग्रजी व्यकरणाच्या नियमात बऱ्याच ठिकाणी बसत नाही . अशा अनुवादाचे सुयोग्य मराठीत पुर्नानुवादीकरण करण्यात सहाय्य हवे आहे.
प्रबोधनाच्या काळात[विशिष्ट अर्थ पहा] समोर आलेल्या संकल्पनात पुढे आलेल्या मुलभूत मानवी आधिकारात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा समावेश होता, आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा समावेश मानवाधिकारांचे संरक्षण करणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय दस्तएवजात समावेश झाला आहे.[९]
It is mentioned in Article 19 of the Universal Declaration of Human Rights as follows:
- "Everyone has the right to freedom of opinion and expression, which implies the right not to hold opinions without interference and to seek, receive and impart regardless of frontiers, information and ideas through any expression whatsoever. "
Similarly, Article 11 of the Declaration of Human Rights and Citizen of 1789:"The free communication of thoughts and opinions is one of the most precious rights of man: every citizen may therefore speak, write and print freely, except to respond to the abuse of this freedom in cases determined by law. "
If the Universal Declaration of Human Rights of 1948 does not specify further conditions or restrictions on that freedom of expression, however, a number of courts, under the aegis of UN and acceding countries, however, impede this freedom by prohibiting the remarks inciting racial hatred, religious and national or under appeal in murder offenses are prohibited by law.
It goes hand in hand with freedom of information and more specifically the freedom of the press, which is freedom for a newspaper owner to say or to conceal what he pleases in his journal, subject to respond before the courts in cases of libel or slander.
Slander and libel are there too, the restrictions imposed on the concept of freedom of expression for any public speech, as incitement to hatred and murder.
The International Covenant on Civil and Political Rights, adopted by the General Assembly of the UN states that freedom of expression includes "freedom to seek, receive and impart information and ideas through any media regardless of frontiers "(Article 4).
साम्यवादी दृष्टिकोण
धार्मिक दृष्टिकोण
युरोपीय दृष्टिकोण
The Article 10 of the European Convention on Human Rights (which applies to all member states of the Council of Europe, much wider than the European Union) provides:
1 Everyone has the right to freedom of expression.This right includes freedom to hold opinions and freedom to receive and impart information and ideas without having interference by public authority and regardless of frontiers.This article shall not prevent States from requiring the licensing of broadcasting, television or cinema to a licensing system. "
२The exercise of these freedoms carries with it duties and responsibilities may be subject to such formalities, conditions, restrictions or penalties provided by law and are necessary in a democratic society in the national security, the territorial integrity or public safety, the prevention of disorder and crime prevention, protection of health or morals, protection of the reputation or rights of others, for preventing disclosure confidential information or for maintaining the authority and impartiality of the judiciary. "
Jurisprudence ( Cour européenne des droits de l'homme , 21 janvier 1999, n o 29183/95, Fressoz et Roire c. France) : Case law (European Court of Human Rights, January 21, 1999, No. 29183/95, and Fressoz Roire v. France):"Freedom of expression applies not only to" information "or" ideas "are favorably received or regarded as inoffensive or indifferent, but also those that offend, shock or disturb; thus the demands of that pluralism, tolerance and the open-mindedness without which there is no "democratic society".
Furthermore, the European Court of Human Rights states, in its decision in "Health Practice", that according to Article 10 of the Convention for the Protection of Human Rights and Fundamental Freedoms, failure renew a certificate by the Joint Committee for publications and news agencies (CPPAP) "amounted to interference by a public authority in the applicant's right to freedom of expression".
अमेरिकी दृष्टिकोण
भारतीय दृष्टिकोण
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आक्षेप आणि प्रतिवाद
व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तीवादातील फरक
मुख्य लेख व्यक्तिवाद
व्यक्ती स्वांतंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संकल्पना व्यक्तीवादापेक्षा (मुलतः) वेगळ्या आहेत.व्यक्ती स्वांतंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संकल्पना संवेदनशीलतेवर आधारीत असल्यामुळे स्वतः व्यक्त होताना/तसे अधिकार आणि स्वातंत्र्य मागताना इतर व्यक्ती आणि समूहाच्या संवेदनांबद्दल आदर बाळगून असण्याची शक्यता अधिक असते.व्यक्तीवादी इतरांबद्दल किंवा समूहाबद्दल संवेदनशील असण्याची अपेक्षा कमी असते.
व्यक्तिस्वातंत्र्य संकल्पनेत व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश होतोच त्या शिवाय इतरही स्वातंत्र्य आणि आधिकार संकल्पनांचा समावेश व्यक्तिस्वातंत्र्य संकल्पनेत होऊ शकतो,जसे गुप्त मतदानाचा अधिकार.
व्यक्तीवादात व्यक्तीचे महत्त्व समूहाच्या intrest पेक्षाही मोठे असते, किंबहूना व्यक्तीही स्वकेंद्रीतपणे केवळ स्वतःचा विकास (सहसा आर्थिक) साधत असते, अशा व्यक्तींना शासनाचेही कमीत कमी नियंत्रण हवे असते.व्यक्तीवादाचा भर प्रवूत्तीवर जास्त असतो, त्यामुळे व्यक्तीवाद निवृत्तीपर तत्वज्ञानांकडून बऱ्याचदा चंगळवाद किंवा वस्तुवाद अशी टिका केली जाताना आढळते, तर समूहवादी (सहसा समाजबवादी आणि साम्यवादी) व्यक्तीवादाचे नाते भांडवलशाही शी जोडताना आढळतात.
व्यक्ती स्वांतंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तीवादावरील टिका करणारी व्यक्ती/समूह एकच असेल तर टिका करताना तिन्हींची जाणते/अजाणतेपणे सरमिसळ करताना आढळतात.
हे सुद्धा पहा
- अभिव्यक्ती
- पाऱ्हेशिया[मराठी शब्द सुचवा]
- माहितीचा अधिकार
- मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र
- नैतिक पाठराखण
- भारतातील मूलभूत हक्क
- संदर्भ घेण्याकरिता तात्पुरते पान
लेखात प्रयुक्त संज्ञा
शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा
प्रयुक्त शब्द | विशेष संदर्भ/अर्थ छटा |
self-fulfillment (The full use of one's own abilities.) | स्व-परिपूर्ती |
Enlightenment Period | प्रबोधनाचा काळ (इतिहास विषयाशी संबंधित संकल्पना) |
प्रयुक्त शब्द | विशेष संदर्भ/अर्थ छटा |
प्रयुक्त शब्द | विशेष संदर्भ/अर्थ छटा |
प्रयुक्त शब्द | विशेष संदर्भ/अर्थ छटा |
इंग्रजी मराठी संज्ञा
State | राज्य, देश या अर्थछटेने,राज्यसत्ता |
reasonable restrictions | माफक बंधने |
exercise of the right | मराठी |
'Article 19 | कलम १९ |
repealed | मराठी |
public order | कायदा आणि सुव्यवस्था |
Enlightenment | मराठी |
instruments | मराठी दस्त एवज? |
human rights | मानवाधिकार |
clause | कलम |
sub-clause | उप-कलम |
sovereignty | सार्वभौमत्व |
integrity | एकात्मकता |
decency | सभ्यता |
morality | नैतिकता |
contempt of court | न्यायालयाचा अवमान |
defamation | बदनामी |
impose | लादणे |
convictions | मराठी विश्वास |
extolled | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
संदर्भ
- ^ html version of the file The Right to Express Oneself and to Seek Information Rikke Frank Jørgensen[permanent dead link] फेब्रु४ २०१० सायं ७:२२ लाजशी दिसली
- ^ Google's cache of Surabhi Singhi IV Semester, National Law University, Jodhpur. It is a snapshot of the page as it appeared on 5 Apr 2010 19:03:17 GMT.
- ^ "संग्रहित प्रत". 2010-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-18 रोजी पाहिले.
- ^ a b Surabhi Singhi . It is a snapshot of the page as it appeared on 5 Apr 2010 19:03:17 GMT.
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-2860009,prtpage-1.cms[permanent dead link]. It is a snapshot of the page as it appeared on 26 Apr 2010 06:53:39 GMT.
- ^ Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=59415:2010-04-02-15-27-08&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10. [मृत दुवा]
- ^ http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=58021:2010-03-27-17-46-46&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2 [मृत दुवा]
- ^ Google's cache of http://epaper.esakal.com/esakal/20100328/5673794414277804586.htm[permanent dead link]. It is a snapshot of the page as it appeared on 28 Mar 2010 05:58:47 GMT.
- ^ http://www.nccr-trade.org/images/stories/mira/ict_freedom%20of%20expression.pdf[permanent dead link].
नोंदी
- [१] Archived 2016-03-13 at the Wayback Machine.
- अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा इतिहास Archived 2010-03-28 at the Wayback Machine.
- टाईम लाईन
- भारतातील अभिव्य्क्तिस्वातंत्र्य प्राप्तीचा इतिहास Archived 2011-03-14 at the Wayback Machine.