Jump to content

अभिमन्यू पवार

अभिमन्यू दत्तात्रेय पवार

सदस्य, महाराष्ट्र विधान सभा
विद्यमान
पदग्रहण
८ नोव्हेंबर २०१९
मागील बस्वराज पाटील
मतदारसंघ औसा

जन्म १ जुलै, १९७१ (1971-07-01) (वय: ५३)
कासार शिर्शी, ता.निलंगा, जि.लातूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
वडील दत्तात्रेय पवार
अपत्ये
निवास ता.औसा,जि.लातूर, महाराष्ट्र, भारत
गुरुकुल दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर (वाणिज्य पदवी), भारतीय व्यवस्थापन संशोधन संस्था पुणे (वैयक्तिक व्यवस्थापन पदव्यूत्तर)
व्यवसाय राजकारणी
संकेतस्थळ www.abhimanyupawar.in

अभिमन्यू दत्तात्रय पवार हे भारतीय जनता पक्षाचे एक भारतीय राजकारणी आहेत. ते चौदाव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.[] त्यांनी लातूरच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयमधून वाणिज्य मध्ये पदवी पूर्ण केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कर्मचारी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली. ते २०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक सहाय्यक होते.[] ते विशेष कर्तव्यावर अग्रणी अधिकारी (ओएसडी), वैयक्तिक सहाय्यक (पीए)[] आणि लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे एक आघाडीचे व सुप्रसिद्ध सदस्य आहेत.

पुर्वीचे जीवन

त्यांचा जन्म १ जुलै १९७१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांनी वनवासी कल्याण आश्रम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक म्हणुन सुमारे १५ वर्षे पूर्ण-वेळ काम केले. २०१० मध्ये त्यांना रामभाऊ महालंगडी प्रबोधिनी पुरस्कार मिळाला. तेथून ते रा.स्व.सं.मध्ये दाखल झाले.[ संदर्भ हवा ]

भुषवलेली पदे

  • २०१४ ते २०१९: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक सहाय्यक.[]
  • २०१९: महाराष्ट्र विधानसभा सदस्य

सामाजिक कार्य

अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्यात रेल्वे बोगी कारखाना बांधकामासाठी रेल्वे मंत्रालयाकडून (भारत) स्विकृती मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पीयूष गोयल यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली, मार्च २०१८ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पायाभरणी केली, १८ ऑगस्टमध्ये लिलाव जिंकण्यासाठी कंत्राट देण्यात आले, प्रत्यक्ष काम १८ सप्टेंबरमध्ये सुरू झाले आणि पहिल्या डब्याचे प्रत्यक्ष उत्पादन डिसेंबर २०१९ मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे.[][]

त्यांनी आपले पथक आणि लातूर जिल्हा प्रशासनासह सर्वप्रथम लातूर येथे महा अटल आरोग्य शिबीर[] यशस्वीरित्या आयोजित केले. वैद्यकीय क्षेत्रातील २५० हून अधिक तज्ज्ञांनी हजारो लोकांचा निशुल्क उपचार केला. लातूर जिल्हा शासकीय रुग्णालयसाठी जमीन देण्याचा मुद्दा लांब पडून होता.

त्यांनी लातूर जिल्ह्यातील हजारो गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून[] कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

संदर्भ

  1. ^ "Abhimanyu Dattatray Pawar ,BJP: Latest Updates on Abhimanyu Dattatray Pawar, Lok Sabha Constituency Seat". NDTV.com.
  2. ^ Mukane, Pratik (31 ऑक्टोबर 2014). "Devendra Fadnavis sworn is as 27th Chief Minister of Maharashtra". DNA India (इंग्रजी भाषेत). 19 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Team CMO | Chief Minister's Office (CMO), Government of Maharashtra". cmo.maharashtra.gov.in (इंग्रजी भाषेत). 19 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ "Abhimanyu Pawar | Official Website". www.abhimanyupawar.in. 2 एप्रिल 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Abhimanyu Pawar, BJP candidate from AUSA: Got ticket only on basis of work I had done". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 25 ऑक्टोबर 2019. 19 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  6. ^ ऑनलाईन, सामना. "मराठवाड्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी समिती बोलावणार…मुख्यमंत्री | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 13 ऑक्टोबर 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Chief Ministers Relief Fund, Maharashtra". cmrf.maharashtra.gov.in. 19 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.