अभिज्ञानशाकुंतलम
कालिदास रचित संस्कृत नाटक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | नाटक | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
लेखक | |||
वापरलेली भाषा | |||
| |||
अभिज्ञानशाकुंतलम हे कवी कालिदासाने रचलेले एक नाटक. यात शकुंतला व राजा दुष्यंताची कहाणी वर्णिलेली आहे. मुळात ही गोष्ट म्हणजे महाभारताचे एक उपकथानक आहे.
नाटकाची थोडक्यात गोष्ट
चंद्रवंशी राजा दुष्यंत हा शिकारीसाठी वनात जातो. तेथे त्यास शकुंतला दिसते. ती एक ऋषिकन्या असते. त्याला ती आवडते व तो तिच्याशी गांधर्व-विवाह करतो. परतण्यापूर्वी लग्न व प्रेमाचे प्रतीक म्हणून तो तिला आपली अंगठी देतो. शकुंतलेच्या हातून दुष्यंतराजाने दिलेली अंगठी हरवते. दरम्यान शकुंतला गर्भिणी होते. दुष्यंत परत वनात न आल्यामुळे ती राजाच्या भेटीस राजप्रासादात येते. परंतु, दुष्यंतास मिळालेल्या दुर्वास मुनींच्या शापामुळे शकुंतला त्याच्या विस्मृतीत गेलेली असते. अंगठी नसल्यामुळे ती राजा दुष्यतांलाआपली ओळख पटवून देउ शकत नाही. या काळातच ती अंगठी एका कोळ्याला माशाच्या पोटात सापडते. तो ती राजास आणून दाखवितो. राजाची स्मृती परत येऊन तो शकुंतलेचा स्वीकार करतो.
अभिज्ञानशाकुंतलमवरील प्राचीन भाषांतील टीका
कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम् (शाकुंतल) या नाटकावर भाष्य करणारी जवळपास दोनशेसत्तर हस्तलिखिते सध्या भारतात अधिकृतरीत्या उपलब्ध आहेत.[ संदर्भ हवा ] विविध प्राचीन भाषांमधून व देवनागरी, ग्रंथी, शारदा, मैथिली, प्राचीन बंगाली, प्राचीन तेलगू, प्राचीन मल्याळी अशा लिपींमधून शाकुंतलवरील भाष्य आणि टीका उपलब्ध आहेत. अशाच प्राचीन भाष्यकारांपैकी आठ भाष्यकारांचे लेखन पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रातील प्रा. डॉ.जयंती त्रिपाठी यांनी केलेल्या संशोधनाद्वारे विचारात घेतले गेले आहे. त्यातील दाक्षिणात्य ग्रंथलिपी, प्राचीन मैथली, देवनागरी, मल्याळम लिपींमधील टीका या संशोधनासाठी अभ्यासण्यात आल्या होता.
या प्रबंधामुळे, 'शाकुंतल' नाटकाविषयी आठ प्राचीन भाषांमध्ये झालेला अभ्यास आता जयंती त्रिपाठींच्या या हस्तलिखित पुस्तकामधून समोर आला आहे. इंग्रजीमध्ये लिहिलेल्या या ग्रंथाद्वारे 'शाकुंतल'चे भाषाशास्त्रीय सौंदर्य, टीकाकारांची माहिती, त्यांची टीका करण्याची पद्धत, व्याख्यापद्धती, शैली, भाषा आदी बाबी, वेगवेगळ्या अभ्यासकांनी 'शाकुंतल'चे लावलेले अर्थ, त्यातून उलगडलेली नाट्यशास्त्राची विविध अंगे या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी जाणून घेता येत आहेत.
नाटकाची भाषांतरे/रूपांतरे
कविकुलगुरू कालिदासाने लिहिलेल्या अभिज्ञानशाकुंतलम् या संस्कृत नाटकाची जगातल्या असंख्य भाषांत भाषांतरे झाली. जगप्रसिद्ध जर्मन कवी गटे याला हे नाटक इतके आवडले की तो या नाटकाचे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचला.
- नाटकाची मराठी भाषांतरे/रूपांतरे आणि त्यांचे लेखक
- मराठी शाकुंतल (लक्ष्मण लेले)
- महाराष्ट्र शाकुंतल (केशव गोडबोले)
- मौजेच्या चार घटिका (महादेव चिमणाजी आपटे)
- शाकुंतल (कृष्णशास्त्री राजवाडे)
शाकुंत नाटकातील चार प्रसिद्ध श्लोक
- काव्येषु नाटकं रम्यं,तत्र रम्यां शकुंतला ।
- तत्रापि च चतुर्थांको, तत्र श्लोक चतुष्टतम् ॥
सर्व काव्यांमध्ये शाकुंतल सर्वात अधिक सुंदर आहे, आणि त्यातही चौथ्या अंकातील चार श्लोक. ते श्लोक असे आहेत :-
- .
- यास्यत्यद्य शंकुन्तलेति हृदयं संस्पृष्टमुत्कण्ठ्या।
- कंठस्तंभितवाष्पवृत्तिकलुषश्चिन्ताजडं दर्शनम्।
- वैक्लव्यम् मम तावदीदृशमिदं स्नेहादरण्यौकसः
- पीड्यंते गृहीणः कथं नु तनया विश्लेषदुःखैर्नवैः।।
२.
- पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु या
- नादत्ते प्रियमण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम्।
- आद्ये वः कुसुमप्रसूतसमये यस्या भवत्युसवः
- सेयं याति शकुंतला पतिगृहं सर्वैरनुज्ञायताम्।।
३.
- अस्मान् साधु विचिंत्य संयमधनानुच्चैः कुलं चात्मनः
- त्वय्यस्याः कथमप्यबान्धवकृतां स्नेहप्रवृत्तिं च ताम्।
- समान्यप्रतिपत्तिपूर्वकमियं दारेषु तद्वदृश्या त्वया
- भाग्यायत्तमतः परं न खलु वाच्यं वधूबन्धुभिः।।
४.
- शुश्रूषस्व गुरून् कुरुप्रियसखीवृत्तिं सपत्नीजने
- भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः।
- भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी
- यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामा कुलस्याधयः।।
नाटके
- शाकुंतल (नाटक - परशुराम गोडबोले)
- संगीत शकुंतला (नाटक - हणमंत महाजनी)
- संगीत शाकुंतल (नाटक - अण्णासाहेब किर्लोस्कर)
- संगीत शाकुंतल (नाटक - वासुदेव डोंगरे)
चित्रपट
- दिग्दर्शक-निर्माते व्ही.शांताराम यांनी अभिज्ञानशाकुंतलाच्याच कथानकावर आधारलेला शकुंतला नावाचा एक हिंदी चित्रपट काढला होता.