Jump to content

अभिजीत सोनवणे

डॉ. अभिजित सोनवणे आणि त्यांची पत्नी डॉ. मनीषा सोनवणे, पुण्यातील अत्यंत वंचित व्यक्तींपर्यंत औषधोपचार पोहोचवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. त्यांच्या संस्थेच्या अंतर्गत हे डॉक्टर दाम्पत्य वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक साधन नसलेल्या व्यक्तींवर उपचार करतात. डॉ. अभिजीत म्हणतात, “आम्ही रस्त्याच्या कडेला सर्व प्राथमिक आरोग्य सेवा आणि तपास वृद्ध भिकाऱ्यांना देतो, ज्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सोडून दिले आहे आणि जे या जगात टिकून राहण्यासाठी भिक्षा मागतात.

दररोज सकाळी डॉ. अभिजित मंदिरे, मशिदी आणि चर्च अशा अनेक ठिकाणी जातात जिथे बहुसंख्य बेघर ज्येष्ठ नागरिक एकत्र जमतात. ते त्यांच्या सोबत  औषधांनी भरलेल्या पिशव्या घेऊन जातात, तपासणी करतात आणि गरजू लोकांना मोफत औषध पुरवतात. ते म्हणतात, “हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आम्ही दररोज १० ते ४ दरम्यान मंदिर, मशिदी आणि चर्च येथे भेट देतो आणि भिकाऱ्याशी संवाद साधतो.

डॉ. अभिजित केवळ वैद्यकीय आणि भावनिक पाठिंबा देण्यास सहाय्य करत नाहीत तर बेघर ज्येष्ठांना स्वतःचे व्यवसाय सुरू करायला मदत देखील करतात.

याव्यतिरिक्त, ते म्हणतात की त्यांचे लक्ष्य या व्यक्तींना आत्मनिर्भर बनविणे आहे. डॉ अभिजित आणि त्यांची पत्नी यांनी एकूण १६० मोतीबिंदु ऑपरेशन केले आहेत. रस्त्यावर वैद्यकीय सेवा देता येत नाही, तेव्हा डॉ. अभिजित त्यांना सार्वजनिक किंवा खासगी रुग्णालयात हलवतात.