अब्दुल कादिर
अब्दुल कादिर खान (उर्दू: عبد القادر خان ) (सप्टेंबर १५, १९५५ - सप्टेंबर ६, २०१९) हे पाकिस्तानी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी खेळाडू आहे. त्याने पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर ६७ कसोटी व १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये सहभाग घेतला. तो उजव्या हाताने लेगस्पिन गोलंदाजी करत असे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर तो समालोचनाचे काम करतो. त्याने पाकिस्तानी क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपदही काही काळ सांभाळले.