Jump to content

अबोलहसन बनीसद्र

अबोलहसन बनीसद्र

इराणचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
८ फेब्रुवारी १९८० – २१ जून १९८१
सर्वोच्च पुढारी रुहोल्ला खोमेनी
पुढील मोहम्मद-अली रजाई

जन्म २२ मार्च, १९३३ (1933-03-22) (वय: ९१)
हमादान, हमादान प्रांत, इराण
राजकीय पक्ष अपक्ष
धर्म शिया इस्लाम
सही अबोलहसन बनीसद्रयांची सही

अबोलहसन बनीसद्र (फारसी: ‌سیِّدابوالحسن بنی‌صدر‎; २२ मार्च १९३३) हा आशियामधील इराण देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९७९ सालच्या इराणी क्रांतीनंतर शहाचे राजतंत्र बरखास्त करून इराणमध्ये इस्लामिक प्रजासत्ताक प्रकारचे सरकार स्थापन करण्यात आले. १९८० सालच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बनीसद्र ७९ टक्के मते मिळवून निवडून आला. परंतु केवळ १ वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर इराण-इराक युद्धाच्या सुरुवातीस बनीसद्रवर महाभियोग चालवण्यात आला व त्याला पद सोडावे लागले. बनीसद्रने पॅरिसला पळ काढला जेथे फ्रेंच सरकारने त्याला आश्रय दिला. आजतागायत तो पॅरिसजवळील व्हर्साय येथे वास्तव्यास आहे.

बाह्य दुवे