Jump to content

अबिदा परवीन

बेगम अबिदा परवीन २००९

बेगम अबिदा परवीन (जन: अली गोहारादाबाद, लारकाना सिंध पाकिस्तान, हयात) या सुफी परंपरेतील पाकिस्तानी गायिका आहेत. पाकच्या सिध प्रांतातील असलेल्या अबिदा परवीन यांनी आपल्या सूफी गायनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळविली. त्यांना "सुफी संगीताची सम्राज्ञी" म्हणून ओळखले जाते. अबिदा या मुख्यतः रक्स ए बिस्मिल या अल्बम मधील "यार को हमने" आणि "तेरे इश्कने नचाया" या गीतांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ही गीते बाबा बुल्लेहशा या सुफी कवि तत्त्ववेत्त्याची आहेत.

अबिदा परवीन यांचे वडील उस्ताद गुलाम हैदर हे स्वतः सुफी गवय्ये होते. "बाबा सैन आणि गवय्या" या शब्दात अबिदा परवीन त्यांचा गौरव करीत.[] अबिदा यांचे प्राथमिक संगीत शिक्षण आणि गायनाचे धडे त्यांनी त्यांच्या वडिलाकांडून घेतले.[]. त्याचबरोबर चौरासिया घराण्याचे उस्ताद सलामत आली खान यांच्याकडून घेतले.[]

जीवन गौरव पुरस्कार

अबिदा परवीन यांना दिल्ली येथील कलाधर्मी बेगम अख्तर गझल अकादमीतर्फे जीवनगौरव पुरस्काराने ऑक्टोबर २०१२ गौरविण्यात आले. हा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने मला मनापासून खूप आनंद झाला. कुठलाही पुरस्कार मिळणे हा एकप्रकारे सन्मानच असतो, असे दूरदर्शनचे संचालक त्रिपुरारी शरण यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना अबिदा परवीन यांनी सांगितले.[]

हेही वाचा

इथे भेट द्या

हेही ऐका

  1. ^ http://sindhiaudio.blogspot.in/2007/08/abida-parveen-biography.html
  2. ^ https://books.google.co.in/books?id=ZU7CKISitZsC&pg=PA247&dq=abida+parveen&lr=&hl=en#v=onepage&q=abida%20parveen&f=false
  3. ^ http://sindhiaudio.blogspot.in/2007/08/abida-parveen-biography.html
  4. ^ तरुण भारत, ०८ ऑक्टोबर २०१२http://tarunbharat.net/ftp/e-paper/2012/2012-10-08/mpage1_20121008.htm[permanent dead link]