अफोन्सो ऑगुस्तो मोरेरा पेना (नोव्हेंबर ३०, इ.स. १८४७:सांता बार्बरा, ब्राझिल - जून १४, इ.स. १९०९:रियो दि जानेरो, ब्राझिल) हा इ.स. १९०६ ते इ.स. १९०९ दरम्यान ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष होता.
राजकारणात शिरण्यापूर्वी मोरेरा पेना वकील व ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होता.