Jump to content

अप्रोप्रिएटली इंडियन (पुस्तक)

अप्रोप्रिएटली इंडियन : जेंडर ॲन्ड कल्चर इन अ न्यू ट्रान्सनॅशनल क्लास[] हे पुस्तक लेखिका स्मिता राधाकृष्णन[] यांनी लिहिले असून ओरियंट ब्लॅकस्वानने २०११मध्ये प्रकाशित केले आहे. स्मिता राधाकृष्णन या वेलस्ली कॉलेजात प्राध्यापक आहेत.

महत्त्वाचा युक्तिवाद

माहिती व तंत्रज्ञान (IT) या क्षेत्रात काम करणाऱ्या १३० लोकांच्या मुलाखतींच्या आधारे सदरचे पुस्तक लिहिले आहे. लेखिकेच्या मते हे नवीन आंतरदेशीय (transnational) भारतीय व्यावसायिक वर्ग सातत्याने भारतातील काही निवडक पद्धतीनं उचलतो व बदलू शकणारे भारतीय सांस्कृतिक नियम (जे पाश्चात्त्य बहुसांस्कृतिक जीवनाला पण साजेसे आहेत) म्हणून स्वीकारतो. लेखक याला 'सांस्कृतिकरीत्या सुप्रवाही' (कल्चरल स्ट्रीमलायनिंग : संस्कृतीला किमान विरोध करतात त्याला आकार देणे) असे संबोधतात. माहिती व तंत्रज्ञान (आय.टी.) व्यावसायिक जेव्हा 'पार्श्वभूमीचा' उल्लेख करतात तेव्हा त्याचे काय अर्थ आहेत हे उलगडण्याचा प्रयत्‍न लेखिका पुस्तकातील ६ प्रकरणांमधून करतात. विविध संभाषणे व स्थानांच्या माध्यमातून व्यक्त होणारे नवीन 'भारतीयत्व' हा त्या शोधण्याचा प्रयत्‍न येथे करतात.

सारांश

पुस्तकातील पहिल्या प्रकरणात भारतीय आय.टी. व्यावसायिकांना असलेले बहुस्तरीय प्रतीकात्मक व भौतिक सत्ता व विशेषाधीकारांचे परीक्षण केलेले आहे. या बहुराष्ट्रीय (transnational) वर्गाला मिळणाऱ्या या विशेषाधीकारांची पाळे-मुळे राष्ट्रीय/आंतरिक उतरंड, जागतिक भांडवल व भारतीय वर्ग रचनेत असल्याचे ते मांडतात.

भारताचे जगाशी होणाऱ्या मैत्री/ मिलापाबाबतीतील चर्चाविश्व शोधण्यासाठी लेखिका दुसऱ्या प्रकरणात कामाच्या ठिकाणाकडे लक्ष केंद्रित करतात. कामाच्या ठिकाणी आय.टी. व्यावसायिक या विविध चर्चाविश्वांना कशा पद्धतीने अधिनियमित करतात हे लेखिकेच्या मुलाखतीद्वारे दिसून येते.

तिसऱ्या प्रकरणात भारतीय आय.टी. क्षेत्र व ढोबळ मानाने जगातील ज्ञानाच्या अर्थकारणात एक यशस्वी भारतीय आय.टी. व्यावसायिक असण्याचे काय अर्थ आहेत याचे परीक्षण केलेले आहे. व्यावसायिक भारतीय मध्यम वर्गाने 'गुणवत्तेचे' तत्त्वज्ञान आत्मसात केलेले दिसते. त्यांच्या चिंता या सामाजिक नसून व्यक्तिगत व तातडीच्या आहेत. व्यक्तिवादाचे त्यांनी लावलेले अर्थ हे कशा पद्धतीने त्यांच्या वैयक्तिक इतिहास व मार्गक्रमणामुळे आहेत यावरील परावर्तन (?) ते नोकरी सोडल्यावरच करू शकतात.

पुस्तकातील ४थ्या प्रकरणात लेखिका वैयक्तिक कथनांकडे बघतात व आय.टी. क्षेत्रात स्वची निर्मिती कशी होते याचा वेध घेतात.

५व्या प्रकरणात लेखिका एक चांगल्या भारतीय कुटुंबाची निर्मिती व त्यात समाविष्ट लिंगभावाचे संतुलन यांचे परीक्षण करतात. त्या दाखवून देतात की जी 'सांस्कृतिकरित्या सुप्रवाही' करण्याची प्रक्रिया कामाच्या ठिकाणी सुरू होते त्याची परम अनुभूती खाजगी क्षेत्रात मिळते.

पुस्तकातील ६वे प्रकरण खाजगी जगाकडे बघते. भारताला एकसंध ठेवणारे हिंदुत्व विचार हे संबधित चर्चाविश्वात आपले मार्ग कसे शोधतात हे त्या दाखवून देतात. दक्षिण आफ़्रिकेतिल भारतीयांच्या कहाण्यांच्या आधारे लेखिका भारतीय नवीन बहुराष्ट्रीय वर्गाला जोडण्यात धर्माची मोलाची भूमिका सोदाहरण स्पष्ट करतात.[]

संदर्भ सूची

  1. ^ Radhakrishnan, Smitha (2011-02-11). Appropriately Indian: Gender and Culture in a New Transnational Class (इंग्रजी भाषेत). Duke University Press. ISBN 0822348705.
  2. ^ "Smitha Radhakrishnan". Wellesley College (इंग्रजी भाषेत). 2018-03-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Book Review: Smitha Radhakrishnan, Appropriately Indian: Gender and Culture in a New Transnational Class - Google शोध". www.google.co.in. 2018-03-23 रोजी पाहिले.