Jump to content

अप्पासाहेब पवार

डॉ. अप्पासाहेब पवार (जन्म :५ मे १९०६ - ३० डिसेंबर १९८१) हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

कोल्हापूर विद्यापीठाच्या एका इमारतीला’डॉ. अप्पासाहेब पवार भवन’ असे नाव देण्यात आले आहे.

अप्पासाहेब पवार यांनी ’ताराबाईकालीन कागदपत्रे’ हा चारखंडी ग्रंथ संपादित केला. तसेच त्यांनी शाहू महाराजांचे चरित्रही लिहिले आहे.