अप्पासाहेब धर्माधिकारी
डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी | |
---|---|
जन्म | दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी १४ मे १९५१ |
निवासस्थान | महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | अप्पासाहेब |
नागरिकत्व | भारत |
पेशा | समाजसेवक |
धर्म | हिंदू |
डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, जन्मनाव दत्तात्रेय नारायण, हे महाराष्ट्रातील भारतीय समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपन, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या आयोजनास कारणीभूत ठरले. २०१४ मध्ये डाॅ. डी वाय पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले.[१] २०१७ मध्ये, ते चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित झाले.[२]
महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी माहिती
जीवन परिचय
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जीवन परिचय करून घेत असताना सर्वप्रथम आपण त्यांचे बालपण याविषयी जाणून घेऊया.
बालपण
धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1951 रोजी रायगड मधील रेवदंडा या ठिकाणी झाला. त्यांचे बालपण , प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रेवदंडा या ठिकाणी झाले.
धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्रात निरूपण व अनेक सेवाभावी उपक्रम हाती घेतले. गोरगरीब जनता अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता यामध्ये अडकलेली आहे. त्यांना मार्गदर्शन वर्गांची आवश्यकता आहे. यासाठीच त्यांनी प्रबोधन सुरू केले. वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन डॉ. श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हे समाजसेवेचे काम आपल्या हाती घेतले. अज्ञानी जनतेला आध्यात्मिक ज्ञान देण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. आपल्या वडिलांनी सुरू केलेले कार्य डॉ. श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे चालू ठेवले. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेला कार्याचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला समजेल की त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने का गौरवण्यात आले असावे.
महाराष्ट्र भूषण निरूपणकार डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची कार्ये
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये अनेक तरुण दारूच्या आहारी गेले होते.अशा तरुणांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्या वडिलांनी जे समाजसेवेचे व्रत स्वीकारले होते. व्रत पुढे चालू राहावे यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले.
1. अंधश्रद्धा निर्मूलन
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सर्वात महत्त्वाचे कोणते कार्य केले असेल तर भोळी बाबडी जनता कर्मकांडांमध्ये अडकून होती. विशिष्ट वर्ग त्यांची लूट करत होता. धर्माच्या आणि कर्मकांडाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची होणारी दिशाभूल अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या बैठकांचा माध्यमातून थांबवली.
2. वृक्षारोपण कार्यक्रम
आज निसर्गाचे सर्व संतुलन ढासळलेले आहे.ते संतुलन जर आपल्याला नीट करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.शासन त्यासाठी विविध उपक्रम राबवत असते आणि या उपक्रमांना हातभार लावण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान दरवर्षी करताना दिसते. आणि त्या प्रतिष्ठानचे प्रमुख या नात्याने त्याचे सर्व श्रेय अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाते.
3. रोजगार मेळावे
लोकांना रोजगाराच्या संधी कुठे आहेत याची बऱ्याचदा माहिती नसते. माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी यासाठी विविध रोजगार मिळावे अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांची अनुयायी यांनी सुरू केले. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
4. स्वच्छता मोहिम
अलीकडच्या काळात व्यक्तीचे आरोग्य विषयीचे प्रश्न का निर्माण झाले आहेत याचा जर आपण शोध घेतला तर आपल्या आजूबाजूला पसरलेले घाणीचे साम्राज्य. हे साम्राज्य घालवण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत आहेत. त्यातून लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. यावर तोडगा काय म्हणून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे अनुयायी यांनी अनेक स्वच्छता मोहीम हाती घेतल्या. समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता अशा विविध स्वच्छता मोहिमा यशस्वी करून लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.
5. व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापना
अलीकडच्या काळात ढाबा संस्कृती मोठ्या प्रमाणात फसवताना दिसत आहे. बरेच तरुण-तरुणी शोक म्हणून किंवा आदर्श मजबूर म्हणून वेगवेगळी व्यसना करताना दिसत आहेत. अशा तरुणांना व्यसनाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अनेक ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र उभी केली.आपल्या बैठकांच्या माध्यमातून त्यांचे प्रबोधन केले.
6. आरोग्य शिबिर
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनेक आरोग्य शिबिरांच्या आयोजन केले या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी भागातील लोकांना आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. जे शिबिराचाच एक भाग म्हणून अनेक रक्तदान शिबिरे देखील आयोजित करण्यात आली.
7. समाज प्रबोधन
समाजाला योग्य दिशा द्यायचे असेल समाजाचे उत्तम प्रबोधन होणे गरजेचे आहे. नेमके हेच कार्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. समाजाला सुयोग्य दिशा दाखवण्याचे काम आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.
8. बाल संस्कार वर्ग
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मते आपल्याला खूप मोठे बदल हवे असतील तर आपण बालपणापासूनच बालकावरती चांगले संस्कार केले पाहिजेत आणि संस्कार व्हावे त्यासाठीच बाल संस्कार वर्गांच्या आयोजन केले जाते. बाल संस्कार वर्ग अगदी निशुल्क असतात कोणत्याही प्रकारची क्रियांमध्ये आकारले जात नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांना सामावून घ्यायला असे समाजकार्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले म्हणून त्यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.
अशा या त्यांच्या कार्यामुळेच त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आणि पुरस्कार प्रदान सोहळा दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटल व गुरुद्वारा समोरील मैदान सेन्ट्रल पार्क गार्डन जवळ येथे संपन्न होणार आहे .
9. रक्तदान शिबिरे
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी देखील आवर्जून उलेख केला की आपण रक्त बनवू शकत नाही मग ज्यांना रक्ताची आवश्यकता आहे त्यांना आपण इतर निरोगी लोकांनी रक्तदान करायला हवे. जेणेकरून लोकांना जीवदान मिळेल.
कार्य कोणतेही असो त्यातून समजाप्रति सेवाभाव लोकांमध्ये रुजवण्याचे काम यापूर्वी नानासाहेब धर्माधिकारी व आज अप्पासाहेब धर्माधिकारी ते कार्य पुढे नेत आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेले पुरस्कार
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आतापर्यंत बऱ्याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान
17 फेब्रुवारी 2004 रोजी रायगड जिल्हा परिषदेतर्फे “रायगड भूषण पुरस्कार”.
11 डिसेंबर 2007 रोजी समर्थ व्यासपीठ, पुणे तर्फे “शिव समर्थ पुरस्कार”.
2007 मध्ये खोपोली नगर परिषदेतर्फे "सन्मानपत्र (प्रमाणपत्र) पुरस्कार" समारंभ.
17 फेब्रुवारी 2009 रोजी सुराज्य फाऊंडेशन, कोल्हापूर तर्फे “सुराज्य फाऊंडेशन जीवन गौरव पुरस्कार”.
28 फेब्रुवारी 2009 रोजी कै.फकीरभाई पानसरे प्रतिष्ठान, पुणे तर्फे “जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पुरस्कार”.
31 मे 2009 रोजी अलिबाग नगर परिषदेतर्फे “सामाजिक प्रबोधनात्मक मानपत्र”.
18 डिसेंबर 2011 रोजी ठाणे महानगरपालिकेतर्फे “सामाजिक प्रबोधनात्मक मानपत्र”.
1 मार्च 2012 रोजी ग्रामपंचायत जाम समर्थ तर्फे “समर्थ रामदास स्वामी पुरस्कार”
पनवेल महानगरपालिकेतर्फे 1 जून 2012 रोजी “सामाजिक प्रबोधनात्मक मानपत्र”.
20 डिसेंबर 2013 रोजी "निदान, तपासणी, आरोग्य धड्यांवरील वैद्यकीय मार्गदर्शनाचा जागतिक विक्रम"
2014 मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने संत साहित्याचे अभ्यासक आणि प्रचारक म्हणून विशेष सत्कार.
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई 4 एप्रिल 2014 रोजी."डॉक्टर ऑफ लिटरेचर" डॉक्टरेट म्हणजेच मानद पदवी देण्यात आली.
2017 मधे पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले तर यंदाच्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर केले.
डॉ. आप्पासाहेबांनी समाज प्रबोधनाच्या कार्यात नाव आणि प्रसिद्धी हे कधीच लक्ष्य ठेवले नाही. या अवाढव्य कामाच्या दर्जाशी आणि शिस्तीशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे ते हे काम कोणत्याही दोषाशिवाय पार पाडू शकले.
संदर्भ
- ^ "समाजसेवक अप्पासाहेब धर्माधिकारी मानद पदवीने सन्मानित". दैनंदिन बातम्या व विश्लेषण. ४ एप्रिल २०१४. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
- ^ "'पद्मश्री' सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा: आप्पासाहेब धर्माधिकारी". लोकसत्ता. २५ जानेवारी २०१७. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
३. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.