अपौरुषेय
अपौरुषेय म्हणजे पुरूषाने (किंवा मानवाने) निर्माण न केलेली गोष्ट म्हणजे एकंदर इश्वरकृत (देवाने निर्मिलेली) गोष्ट होय. हिंदू परंपरेत वैदिक साहित्याला अपौरुषेय आहे मानले जाते. वेद हे परमेश्वराचे निःश्वास आहेत त्यामुळे ते कोणी पुरुषाने म्हणजे व्यक्तींनी रचलेले नाहीत असे मानले जाते. साधारणपणे अपाेेैरुषेय हा शब्द वेदांबद्दल वापरला जातो. जे काम सहज होणे कठीण आहे, ते अपौरुषेय मानले जाते.