Jump to content

अपोलो

अपोलो किंवा ॲपोलो हा ग्रीक तसेच रोमन संस्कृतीतील एक महत्त्वाचा देव आहे. हा फीबस, लॉक्झिआस इत्यादी नाचांनीही ओळखला जातो. ग्रीक दंतकथेनुसार ऑलिंपस पर्वतावर राहणाऱ्या बारा दैवतांपैकी हा एक होता.

ॲपोलो हा वडील झ्यूस अणि आई लीटो यांचा पुत्र आणि आर्टेमिसचा भाऊ होता.

ॲपोलो हा औषधी, संगीत, धनुर्विद्या, भविष्यकथन, प्रकाश आणि तारुण्य यांचाही देव होय. मेंढ्या-गुरे यांच्या कळपाची काळजी घेणारा देव.

स्वतःच्या निवासाठी त्याने डेल्फी हे ठिकाण जिंकून घेतले. त्यासाठी डेल्फीचा संरक्षक व नरकपुरीच्या आसुरी शक्तीचे प्रतीक असलेल्या पायथॉन हा अग्निसर्प अपोलोने ठार केला.

सूर्यालाही काही वेळा ॲपोलो म्हणतात.



बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवतेझ्यूसहिअरापोसायडनडीमिटरहेस्तियाऍफ्रडाइटी अपोलोऍरीसआर्टेमिसअथेनाहिफॅस्टसहर्मीस
रोमन दैवतेज्युपिटरजुनो नेपच्यूनसेरेसव्हेस्टाव्हीनसमार्सडायानामिनर्व्हाव्हल्कनमर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.