Jump to content

अपरांत

अर्थ

"अपरा" याचा अर्थ पश्चिम असा होतो, आणि म्हणून (भारताच्या) पश्चिम दिशेचा "अंत" म्हणजेच अपरांत. भारतातील पश्चिम किनाऱ्यालगतच्या कोकण किनारपट्टीला बौद्धकाळात अपरांत(क) म्हणत, आणि क्वचित आजही कोकणाला अपरांत म्हणतात. या अपरांत भूमीची राजधानी होती शूर्पारक(पाली भाषेत'सुप्पारक'). हिलाच नालासोपारा हे प्रचलित नाव आहे. ही मुळची परशुरामाने (जामदग्नीने) निर्माण केलेली भूमी आहे, असे सांगितले जाते. नालासोपारा या ठिकाणी भगवान बुद्ध यांचे भिक्षापात्र आहे. येथे अनेक बौद्ध कालीन लेणी आणि सम्राट अशोकाने बांधलेला बौद्ध स्तूप आहे.

'तत: शूर्पारकं देश सागरस्तस्य निर्ममे, सहसा जामदग्नस्य सोपरान्तमहीतलम'। ... महाभारत (शांतिपर्व)

ऐतिहासिक संदर्भ

भगवान श्रीविष्णूने परशुराम अवतार घेऊन निर्माण केलेली भूमी म्हणजे अपरांत असा उल्लेख भागवतात आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशुराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिणी (इंग्रजी : Poinguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. [१] या ठिकाणी परशुरामांचे कायमचे अस्तित्व आहे असे मानले जाते. अरुणाचल प्रदेशातही परशुराम कुंड व परशुरामाचे देऊळ आहे. केरळात तिरुवलम आणि परशूर या दोन गावांत परशुरामाचे प्रत्येकी एक मंदिर आहे.

दहा दिशा

East, पूर्व, प्राची, प्राक्. West, पश्चिम, प्रतीचि, अपरा. North, उत्तर, उदीचि. South, दक्षिण, अवाचि. South-East, आग्नेय. South-West, नैर्ऋत्य. North-West, वायव्य. North-East, ईशान्य. Zenith, ऊर्ध्व. Nadir, अधः.