अपमिन्स्टर
अपमिन्स्टर | |
---|---|
चर्च ऑफ सेंट लॉरेन्स | |
अपमिन्स्टर Location within the United Kingdomसाचा:Infobox UK place/NoLocalMap | |
लोकसंख्या | २५,३६१ [१] |
ऑर्डनन्स सर्वे नॅशनल ग्रिड | TQ560865 |
• चॅरींग क्रॉस | १६.५ मैल (२६.६ किमी) WSW |
ग्रेटर लंडन | |
देश | इंग्लंड |
Sovereign state | युनाइटेड किंगडम |
पोस्ट टाऊन | अपमिन्स्टर |
जिल्ह्याचा पोस्ट कोड | आर.एम. १४ |
डायलिंग कोड | ०१७०८ |
पोलिस | |
अग्निशमन सेवा | |
रुग्णवाहिका | |
इंग्लंडची संसद |
|
अपमिन्स्टर हे लंडनचे एक उपनगरी शहर आहे. तसेच ते लंडन बरो ऑफ हेवरिंगचा एक भाग आहे. चेरिंग क्रॉसच्या पूर्व-ईशान्य दिशेस २६.६ किलोमीटर (१६.५ मैल) अंतरावर स्थित आहे. लंडन योजनेत हे स्थानिकदृष्ट्या महत्त्वाचे जिल्हा केंद्र आहे. यात बरेच शॉपिंग स्ट्रीट आहेत आणि मोठे रहिवासी क्षेत्र आहे. पूर्वी हे एक ग्रामीण गाव होते, तो एसेक्स काउन्टीमधील स्वतंत्र चर्च व स्वतंत्र धर्माधिकारी असलेला असा एक विभाग होता. हे शहर वाहतुकीच्या दृष्टीने चांगले जोडलेले आहे. हे लंडनला इ.स. १८८५ मध्ये रेल्वेने जोडले गेले होते. सध्या ते लंडन अंडरग्राउंड नेटवर्कवर टर्मिनल स्टेशन आहे. अपमिन्स्टरचा आर्थिक प्रगती शेतीपासून सुरू होऊन उपनगरापर्यंत झालेली आहे. २० व्या शतकात लंडनच्या उपनगरी विकासाचा एक भाग म्हणून अपमिन्स्टरने छाने पायंडा पाडला आहे. अपमिन्स्टरमध्ये लोकसंख्येत लक्षणीय वाढ दिसून येते. इ.स. १९३४ मध्ये होर्नचर्च अर्बन डिस्ट्रिक्टचा भाग बनला आणि इ.स. १९६५ पासून ग्रेटर लंडनचा भाग बनला.
इतिहास
नावे
१८८१ | १२०२ |
---|---|
१८९१ | १४०९ |
१९०१ | १४७७ |
१९११ | २४६८ |
१९२१ | ३५५९ |
१९३१ | ५७३२ |
१९४१ | युद्ध # |
१९५१ | १३०३८ |
# युद्धा दरम्यान जनगणना झाली नव्हती | |
स्रोत: युकेची जनगणना [२] |
इ.स. १०६२ मध्ये या शहराची नोंद अपमिन्स्ट्रे म्हणून सापडते. इ.स. १०८६ डोमेस्ड पुस्तकामध्ये उपमंस्ट्र्रा म्हणून नोंदले गेले होते.[३] हा शब्द जुन्या इंग्रजी अप आणि मिन्स्टरपासून बनलेले आहे. याचा अर्थ उंच मैदानावरील मोठे चर्च असा होतो. सेंट लॉरेन्स येथील रहिवासी या चर्चचा संबध इंग्रेबॉर्न नदीच्या खोऱ्याशी असल्याचे सांगतात. या नदीवरील पुलाला अपमिन्स्टर ब्रिज हे नाव दिलेले आहे.[३] अजून एक विचारधारा असेही सांगते की अप्पर एंग्लो-सॅक्सन काळातील बार्किंग किंवा टिल्बरी येथील चर्चशी भौगोलिक संबंध असावा.[४]
आर्थिक प्रगती
पहिल्या शतकापासून ते तिसऱ्या शतकापर्यंतच्या अपमिन्स्टर क्षेत्रात रोमन लोकांची शेती होती. पुढील अनेक शतकांपर्यंत शेती हाच या भागातील प्रमुख उद्योग होता.[५] या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात जंगल होते, परंतु १२ व्या शतकात जंगलतोडीमुळे येथे शेतीयोग्य अधिक जास्त जमीन तयार झाली. १७ व्या शतकापर्यंत येथे विविध पिके आणि जनावरे पाळली जात होती.[५] १९व्या शतकात येथील बागकामाच्या बाजारात मागणी वाढली. या भागत मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या बाधंण्यात आल्या. इ.स. १८०३ मध्ये बांधलेली स्मोक मिल अजूनही शाबूत आहे.[६] येथील स्थानिक उद्योगात जनावरांची कातडी कमावणे, रेव काढणे आणि विटांची निर्मिती करणे असे उद्योग होत होते. ही जागा इ.स. १८९५ मध्ये ट्रामवेने रेल्वे स्थानकला जोडली गेली होती.[५] फेनचर्च स्ट्रीटपासून लंडन, टिलबरी आणि साऊथहंड रेल्वेचे काम बार्किंग ते अपमिन्स्टर पर्यंत १८८५ मध्ये वाढविण्यात आले.[७] इ.स. १९०२ मध्ये भूमिगत व्हाइटचेपल आणि बो रेल्वेगाडी उघडली आणि हा जिल्हा रेल्वेच्या सेवांद्वारे अपमिन्स्टरशी जोडला गेला. इ.स. १९०५ मध्ये या जिल्ह्यात रेल्वेचे इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाले. पहिल्या महायुद्धात विलंब झाल्यामुळे लंडन, मिडलॅंड आणि स्कॉटिश रेल्वेने उपमिन्स्टरपर्यंत विद्युत ट्रॅक वाढविले आणि इ.स. १९३२ मध्ये हे पुन्हा सुरू झाले.[८][९]
संदर्भ
- ^ Census Information Scheme (2012). "2011 Census Ward Population Estimates". Greater London Authority. 2014-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 January 2013 रोजी पाहिले.
- ^ साचा:Cite vob
- ^ a b Mills, D. (2000). Oxford Dictionary of London Place Names. Oxford.
- ^ Blair, John (2005). The Church in Anglo-Saxon Society. Oxford University Press. p. 102.
- ^ a b c Powell, W.R. (Edr.) (1978). Upminster: Introduction and manors, A History of the County of Essex: Volume 7. Victoria County History. British History Online. 6 February 2010 रोजी पाहिले.
- ^ Richardson, John (2000). The Annals of London. Cassell & Co. ISBN 1-84188-135-X.
- ^ "London, Tilbury and Southend Railway", Local Studies Information Sheets, Barking and Dagenham London Borough Council, 2008, 11 फेब्रुवारी 2010 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित, 8 फेब्रुवारी 2010 रोजी पाहिले
- ^ Rose, Douglas (1999). The London Underground: A diagrammatic history (7 ed.). Douglas Rose. ISBN 1-85414-219-4.
- ^ Wolmar, Christian (2005). The Subterranean Railway: How the London Underground Was Built and How It Changed the City Forever. Atlantic Books. p. 268. ISBN 1-84354-023-1.