Jump to content

अपना दल (सोनेलाल)

अपना दल (सोनेलाल)
पक्षाध्यक्षअनुप्रिया पटेल
लोकसभेमधील पक्षनेताअनुप्रिया पटेल
स्थापना१४ डिसेंबर २०१६
मुख्यालयलखनौ, उत्तर प्रदेश
युतीराष्ट्रीय लोकशाही आघाडी
लोकसभेमधील जागा
२ / ५४५
राज्यसभेमधील जागा
० / २४५
विधानसभेमधील जागा
१२ / ४०३
(उत्तर प्रदेश)
राजकीय तत्त्वेशेतकरी हितरक्षा

अपना दल (सोनेलाल) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. ह्या पक्षाचे समर्थक प्रामुख्याने वाराणसी भागातील व गंगा नदीच्या खोऱ्यात वसलेले कुर्मी ह्या शेतकरी जातीचे लोक आहेत. २०१६ साली अपना दल ह्या पक्षामधून बाहेर पडून अनुप्रिया पटेल ह्यांनी अपना दल (सोनेलाल) पक्षाची स्थापना केली. आजच्या घडीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.

२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत ९ जागांवर विजय मिळवल्यानंतर २०२२ विधानसभा निवडणुकीत अपना दल (सोनेलाल)ने १२ जिंकल्या.

२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये मिर्झापूर येथून पक्षाध्यक्षा अनुप्रिया पटेल तसेच रॉबर्ट्सगंज येथून पकौडी लाल हे अपना दल (सोनेलाल)चे दोन उमेदवार निवडून आले.

बाह्य दुवे