अपत्य परजीवी
अपत्य परजीवी किंवा परभृत सजीव (इंग्रजी:brood parasite) हे ते जीव आहेत जे आपल्या पिलांना वाढवण्यासाठी इतरांवर अवलंबून असतात. काही विशिष्ट जातीचे पक्षी, कीटक आणि मासे यांच्यात ही रणनीती दिसून येते. अपत्य परजीवी हे यजमानाला चलाखीने फसवून, त्यांच्या अंड्याची नक्कल करून, म्हणजे यजमानाच्या अंड्यासारखी हुबेहूब दिसणारी अंडी त्याच्या घरट्यात घालतो. यामुळे यजमानाला ते अंडे स्वतःचे असल्यासारखे वाटते आणि तो ते अंडे आपल्या अंड्यांसोबत उबवतो. यात अपत्य परजीवी हा यजमानाच्या जातीचा असू किंवा नसू पण शकतो.[१]
यामुळे अपत्य परजीवी पालक आपल्या पिलांचे संगोपन करणे किंवा त्यांच्यासाठी घरटे बांधणे या गुंतवणुकीपासून मुक्त होतो, ज्यामुळे त्यांना स्वतःसाठी अन्न मिळवणे आणि पुढील संततीसाठी लवकर अंडी घालणे यासारख्या इतर कामांवर अधिक वेळ मिळतो. याचे सर्वात सहज दिसणारे उदाहरण म्हणजे कोकीळ आणि कावळा पक्षी होय. नर कोकीळ पक्षी कावळ्याच्या जोडप्याला परेशान करून आपल्या मागेमागे येण्यासाठी बाध्य करतो. दरम्यानच्या वेळेत मादी कोकिळा कावळ्याच्या घरट्यात एक अंडे घालते आणि तेथून निघून जाते.[२][३][४]
यात घातलेल्या अंड्यातून पिल्ले निघणे हे यजमान प्रजातीच्या वर्तणुकीवर अवलंबून असते. काही यजमान प्रजातींमध्ये खूप मजबूत नकारात्मक भावना असते. अशावेळी ते ही जबरदस्तीने घातलेली अंडी फोडून टाकतात किंवा घरट्याबाहेर काढतात. परिणामी अपत्य परजीवी प्रजाती यजमान प्रजातीच्या अंड्याची हुबेहूब नक्कल करण्यासाठी विकसित होतात. तर काही प्रजातींमध्ये, यजमान नकारात्मक भावना दर्शवत नाहीत आणि परिणामी, परजीवी प्रजाती कोणतेही फारसे उत्क्रांत वैशिष्ट्य दर्शवणार नाहीत.[५]
अपत्य परजीवी नेहमीच आपली अंडी एका ठराविक प्रजातीच्या घरट्यातच घालतील असे नाही. ते विविध प्रकारच्या प्रजातीच्या घरट्याची निवड करू शकतात.[६]
संदर्भ
- ^ लोकमत न्यूझ नेटवर्क. "पिलं एकाची, घास भरवणारा दुसराच!". Lokmat.com. 2021-11-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "कावळा (Crow)". marathivishwakosh.org. १० नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "पाऊसपक्षी : कारुण्य कोकिळा". लोकसत्ता. 2021-11-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १० नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ Payne, Robert B. (1997). "Avian brood parasitism". In Clayton, Dale H.; Moore, Janice (eds.). Host-parasite evolution: General principles and avian models. Oxford University Press. pp. 338–369. ISBN 978-0-19-854892-8.
- ^ Rothstein, Stephen I. (1990). "A Model System for Coevolution: Avian Brood Parasitism". Annual Review of Ecology and Systematics. 21: 481–508. doi:10.1146/annurev.ecolsys.21.1.481. JSTOR 2097034.
- ^ Stevens, Martin (2013-10-21). "Bird brood parasitism". Current Biology. 23 (20): R909–R913. doi:10.1016/j.cub.2013.08.025. ISSN 0960-9822. PMID 24156805.