Jump to content

अपंगांचे सांस्कृतिक कार्यक्रम

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

हम होंगे कामयाब

परिचय

कोल्हापूर शहरात नसीमा हुरजूक‎ यांनी १९८४ साली अपंग विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक तसेच सामाजिकदृष्ट्या पुनर्वसनाचे काम करणारी ‘हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड’ नावाची संस्था स्थापन केली..

‘हम होंगे कामयाब’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेच्या विविध उपक्रमांपैकी एक आहे.

सुरुवात

हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड या संस्थेचे विश्वस्त देशभ्रतार यांच्या संकल्पनेतून ‘हम होंगे कामयाब’ हा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जानेवारी २००१ पासून सुरू झाला.

माहिती

‘हम होंगे कामयाब’ हा कार्यक्रम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, कराड, चिपळूण, महाड, मुंबई, पुणे, संगमनेर आणि अहमदनगर या ठिकाणी तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा, हैदराबाद या ठिकाणी झाला आहे. या कार्यक्रमासाठी सुरुवातीच्या काळात ‘अनाम प्रेम’ व ‘स्नेह परिवार’ या संस्थांनी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या संस्थेच्या अपंग विद्यार्थ्यांना विशेष संधी देऊन प्रोत्साहित केले.

संस्थेच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील खडकीमधील ‘पॅराप्लेजिक होम’च्या भारतीय सैनिकांनी व्हीलचेअर कशा पद्धतीने कौशल्यपूर्वक व विविध प्रकारे हाताळावी याचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना व्हीलचेअरच्या नृत्यासाठी करता आला.

नृत्य दिग्दर्शनासाठी विद्यार्थ्यांना सागर बगाडे व संस्थेच्या कु. रेखा देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

वैशिष्ट्य

हम होंगे कामयाब या कार्यक्रमात सहभागी झालेले अपंग कलाकार आपले अपंगत्व न दाखवता त्यांच्यातील कला सादर करतात. या कार्यक्रमात संस्थेचे विद्यार्थी, संस्थेत काम करणारे अन्य लोक आणि सुदृढ विद्यार्थीही उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
या कार्यक्रमात १५ वर्षात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. या सगळ्या कार्यक्रमामुळे त्याच्यामध्ये बदल घडून येतो .

घटक

हम होंगे कामयाब या कार्यक्रमाचा आकर्षणबिंदू म्हणजेच व्हीलचेअर नृत्य. या सांस्कृतिक कार्यक्रमातील विविध सादरीकरणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • भारतीय संगीताधारित नृत्य
  • पाश्चात्त्य संगीताधारित नृत्य
  • गायन
  • वादन
  • मूकनाट्य
  • समाजप्रबोधनपर संदेश देणारे नृत्याविष्कार, इत्यादी.

उद्दिष्ट

हम होंगे कामयाब या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे सहभागी कलाकारांचे मानसिक पुनर्वसन होते तसेच त्यांचा आत्माविश्वाश वाढण्यास मदत होते.
या उपक्रमामुळे कार्यक्रम पाहणाऱ्या मानसिक दृष्ट्या खचलेल्या व्यक्तींनाही जगण्याची एक नवी उमेद मिळते असा अनुभव आला आहे.