Jump to content

अन्नपूर्णा

अन्नपूर्णा पर्वत रांग नेपाळ मधून

हिमालयातील ५५ किमी लांबीच्या अन्‍नपूर्णा पर्वतरांगेतले अन्नपूर्णा १ - उंची ८०९१ मी. - हे सर्वोच्च शिखर आहे. हे मध्य नेपाळमध्ये आहे. हे शिखर जगातले १०वे सर्वोच्च शिखर असून ८००० मीटरपेक्षा उंच असलेल्या १४ शिखरांमध्ये याचा समावेश होतो. शिखराच्या पूर्वेला गंडकी नदी वाहते व धवलगिरी या पर्वतशिखरांची रांग तिने वेगळी केली आहे. अन्नपूर्णा ही हिंदू संस्कृतीमध्ये दुर्गादेवीचा अवतार असून ती सुपीकतेचे प्रतीक आहे.

अन्नपूर्णा शिखराचा आजूबाजूचा भाग हा अन्नपूर्ण सं‍रक्षण क्षेत्रामध्ये संरक्षित केला आहे, याचे एकूण क्षेत्रफळ ७६२९ चौ.किमी इतके आहे हे नेपाळमधील पहिले व सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्राची स्थापना राजे महेंद्र यांनी १९८६ मध्ये केली. या भागात ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप आहे.

अन्न्पूर्णा १ हे गिर्यारोहणासाठी जगातील सर्वात धोकादायक शिखर मानले जाते. आकडेवारीनुसार सर्वाधिक अपघात या शिखरावर होतात व त्यात मरण पावणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. चढाई करणाऱ्यांपैकी ४० टक्के गिर्यारोहक मृत पावतात. २०१२ पर्यंत फक्त १९१ गिर्यारोहकांना या शिखरावर चढण्यात यश आले आहे. हे शिखर धवलगिरी शिखरापासून फक्त ३४ किमी अंतरावर असून या दोहोंच्या मधून ‘गंडकी’ नावाची नदी वाहते. या नदीचे पात्र जगातील सर्वात खोल पात्र (दोन अष्टहजारी शिखरांच्या मध्यातून वाहते) म्हणून ओळखले जाते. १९५० साली मॉरिस हेझरेग यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच गिर्यारोहक धवलगिरी पर्वत शिखरावर चढाई करत असताना, त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीमध्ये या गिर्यारोहक संघाने धवलगिरीचा नाद सोडून, आपला मोर्चा ‘अन्नपूर्णा’ शिखराकडे वळविला. यामध्ये त्यांना ते शिखर सर करण्यात यश आले.

भूगोल

अन्नपूर्णा पर्वत रांगेत खालीलप्रमाणे सहा मुख्य शिखरे आहेत

अन्नपूर्णा १८,०९१ मी(२६,५४५ फूट)28°35′42″N 83°49′08″E / 28.595°N 83.819°E / 28.595; 83.819 (Annapurna I)
अन्नपूर्णा २७९३७ मी(२६,०४० फूट) Ranked 16th; Prominence=2,437 m28°32′20″N 84°08′13″E / 28.539°N 84.137°E / 28.539; 84.137 (Annapurna II)
अन्नपूर्णा ३७,५५५ मी(२४,७८६ फूट) Ranked 42nd; Prominence=703 m28°35′06″N 84°00′00″E / 28.585°N 84.000°E / 28.585; 84.000 (Annapurna III)
अन्नपूर्णा ४७,५२५ मी(२४,६८८ फूट)28°32′20″N 84°05′13″E / 28.539°N 84.087°E / 28.539; 84.087 (Annapurna IV)
गंगापूर्णा७,४५५ मी(२४,४५७ फूट)28°36′22″N 83°57′54″E / 28.606°N 83.965°E / 28.606; 83.965 (Gangapurna)
अन्नपूर्णा दक्षिण७,२१९ मी(२३,६८४ फूट)28°31′05″N 83°48′22″E / 28.518°N 83.806°E / 28.518; 83.806 (Annapurna South)
The Annapurna Himal from the northeast. Left to right: Annapurna II and IV (close together); a major col; Annapurna III and Gangapurna; Annapurna I.

बाह्य दुवे