अनुहार (कादंबरी)
अनुहार ही डॉ. सुमति क्षेत्रमाडे लिखित इ.स. २०१३ प्रकाशित झालेली मराठी कादंबरी आहे. बंगालमधील प्रसिद्ध वैष्णव संत चैतन्य महाप्रभु यांच्या आयुष्यावर आधारित ही कादंबरी आहे. चैतन्य महाप्रभुंच्या जोडीने त्यांची पत्नी विष्णुप्रिया यांचाही जीवनालेख या कादंबरीत आहे.
कादंबरीची पार्श्वभूमी
चैतन्य महाप्रभु यांचा काळ इ.स. १४८५ ते १५३३ या दरम्यानचा आहे.बंगालमधे गंगा नदीच्या तीरावर असलेले नवद्वीप किंवा नदिया हे त्यांचे मूळ गाव होते. तत्कालीन भारतात मुसलमानी राजवटीचा प्रभाव होता. मांसभक्षण,मदिरापान,महिलांवर अत्याचार अशा पद्धतीने मुसलमानांचे संकट समाजात पसरलेले होते. त्यामुळे हिंदू धर्माचे समाजातील महत्व कमी होत चालले होते.अननीती,भ्रष्टाचार यांचा प्रभाव समाजात दिसत होता. अशा परिस्थितीत धर्मभ्रष्ट झालेल्या समाजाचा उद्धार करण्याचे काम भारताच्या विविध भागात विविध संतांनी केले. बंगालमधे वैष्णव संप्रदायाची स्थापना करण्याचे कार्य चैतन्य महाप्रभु यांनी केले आहे.
कादंबरीतील प्रमुख पात्रे आणि कथावस्तू
या कादंबरीतील प्रमुख पात्र म्हणजे चैतन्य महाप्रभु.बालपणी त्यांना निमाई असे संबोधले जात असे. लहानपणापासूनच विरागी वृत्तीचे असलेले निमाई पंडित सर्व शास्रांमधे पारंगत झालेले होते. न्यायशास्रावर त्यांनी तरुणपणातच ग्रंथ लिहीला होता. त्यांना लोक आदराने गौरांग प्रभु असेही म्हणत असत.हा त्यांचा सर्व जीवनप्रवास आणि वैष्णव संप्रदायाची त्यांनी केलेली स्थापना हा या कादंबरीचा मुख्य विषय आहे. विष्णुप्रिया ही चोतन्य महाप्रभु यांची पत्नी. सात्विक आणि सुंदर असलेली ही युवती महाप्रभुंच्या जीवनकार्याशी एकरूप झाली आहे आणि त्याचे वर्णन कादंबरीत आहे. चोतन्य महाप्रभुंनी विवाह झाल्यानंतरही आपल्या कार्यासाठी संन्यास घेतला तरीही तिच्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर कमी झालेला नाही. निमाईची माता शचिमाँ, यांचा निमाईच्या आयुष्यातील सहभागही कादंबरीत दिसून येतो.
अन्य तपशील
अनुहार डाॅ.सुमति क्षेत्रमाडे रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर २९ आॅगस्ट २०१३