Jump to content

अनुशीलन समिती

स्थापना

ऑगस्ट १९०२

श्री.प्रमथनाथ मित्र यांनी श्री.सतीश भूषण रॉय चौधरी यांच्या सहाय्याने क्रांतिकारकांच्या अनुशीलन समितीची स्थापना केली. या समितीच्या स्थापनेमध्ये भगिनी निवेदिता यांचाही सहभाग होता.

अनुशीलन समितीचे संस्थापक - प्रमथनाथ मित्र

कार्याचे स्वरूप

या समितीच्या शाखा बंगालभर सुरू करण्याचे काम बारीन्द्र कुमार घोष यांनी केले. खेळण्याच्या निमित्ताने, देवळात प्रार्थनेच्या निमित्ताने एकत्र जमायचे आणि तरुणांना लाठी, खड्ग, लक्ष्यवेध यांचे प्रशिक्षण द्यायचे, देशाच्या इतिहासावर, संस्कृतीवर, राजकीय घडामोडींवर चर्चा करायची असा प्रघात सुरू झाला. बऱ्याच वेळी भगिनी निवेदिता यांच्या घरी या बैठकी होत असत. []

देवव्रत बसू, नलिनी मित्र, विवेकानंद यांचा धाकटा भाऊ भूपेंद्रनाथ दत्त, सखाराम गणेश देऊसकर ही तरुण मंडळी या समितीमध्ये कार्यरत झाली.

अनुशीलन समितीचे बोधचिन्ह

बाह्य दुवे

अनुशीलन समिती (विकिपीडिया - इंग्रजी लेख)

संदर्भ

  1. ^ वि.वि.पेंडसे (१९६३). विवेकानंद कन्या - भगिनी निवेदिता. पुणे: वि.वि.पेंडसे.