अनुवांशिक संबंध (भाषाविज्ञान)
भाषाविज्ञानात अनुवांशिक संबंध ही संबंधांसाठी सामान्य संज्ञा आहे जी भाषेमध्ये त्याच भाषेच्या कुटुंबांच्या सदस्यांमध्ये असते. एकाच भाषेच्या गटभागाशी संबंधित घनिष्ठ संबंध असलेल्या भाषा एक भाषाकुटुंबीय म्हणून ओळखल्या जातात. हे संबंध भाषिक विश्लेषणाच्या तुलनात्मक पद्धतीच्या उपयोगाने स्थापित केलेले असतात. दोन भाषा अनुवांशिकतेने संबंधित आहेत असे मानले जाते जर का त्या भाषेंचा पुर्वज एकच असेल किंवा एक् भाषा दुसऱ्या भाषेतून जन्माला आलेली असेल. उदाहरणार्थ, इटालियन ही भाषा लॅटिन भाषेपासून जन्मली आहे. म्हणूनच इटालियन व लॅटिन यांना अनुवांशिकतेने संबंधित असे म्हणले जाते. स्पॅनिश देखील लॅटिन भाषेपासून जन्मली आहे. म्हणून, स्पॅनिश आणि इटालियन अनुवांशिकदृष्ट्या संबंधित आहेत. त्याचप्रमाणे, डॅनिश, स्वीडिश आणि नॉर्वेजियन हे आनुवंशिकरित्या इंडो-युरोपियन भाषा कुटुंबातील उत्तर जर्मनिक शाखेच्या माध्यमातून संबंधित आहेत.