Jump to content

अनुरूप संदेशवहन

अनुरूप संदेशाचा आलेख ('t' अक्षावर वेळ आणि 'X' अक्षावर संदेशाचे मूल्य दर्शवले आहे.)

अनुरूप संदेशवहन (इंग्लिश: Analog Signalling, अ‍ॅनालॉग सिग्नलिंग) ही इलेक्ट्रॉनिक संदेशवहनाची एक जुनी पद्धत आहे. प्रत्येक संदेश हा एक आलेख आहे अशी कल्पना केल्यास 't' अक्षावर वेळ आणि 'X' अक्षावर त्याचे [[मूल्य दाखवता येईल. अनुरूप पद्धतीतला संदेश सलग असून तो एका माहीत असलेल्या सूक्ष्म तरंगलांबीच्या संदेशावर आरूढ करून पाठवला जातो. सूक्ष्म तरंगलांबीच्या लहरी दूरवर सहजरीत्या पोचू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने पाठविलेला संदेशांचा पल्ला कित्येक पटीने वाढतो. संदेश ग्रहण करण्यासाठी याच्या उलट क्रिया केली जाते. म्हणजेच ग्रहण केलेल्या संदेशातून सूक्ष्म तरंगालांबीचा संदेश वेगळा केला जातो. प्रत्यक्षात वरवर साध्या दिसणाऱ्या या तंत्रात खूप कमतरता आहेत. हे तंत्र नैसर्गिक विद्युत-चुंबकीय प्रदूषणाला बळी पडू शकते. हा या पद्धतीतला एक दोष आहे.