Jump to content

अनुराधा मराठे


अनुराधा मराठे (जन्म : १५ जुलै १९५१) या शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका आहेत. त्या पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या आहेत. गायिका अंजली मराठे-कुलकर्णी ही अनुराधा मराठे यांची कन्या असून गायक-संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी हे त्यांचे जावई आहेत.

अनुराधा मराठे यांनी 'मंत्र' या मराठी चित्रपटात काम केले आहे.

अनुराधा मराठे यांची गाजलेली गाणी

  • इतनी शक्ती दे हमें दाता
  • कुंभारासारखा गुरू नाही (कवी : ग.दि. माडगूळकर; संगीतकार : गजानन वाटवे)
  • जीवन त्यांना कळलें हो (स्फूर्तिगीत; सहगायक - अंजली मराठे, रवींद्र साठे; कवी - बा.भ. बोरकर)
  • प्रथम तुला वंदितो

अनुराधा मराठे यांनी गायलेली गाणी असलेले चित्रपट

  • जन्मटीप
  • ती तिथे मी
  • दहावी फ
  • मायेची सावली
  • गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं
  • लावण्यवती
  • संसार माझा भाग्याचा

आत्मचरित्र

अनुराधा मराठे यांनी 'स्वरानुराधा' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.