Jump to content

अनुराधा भोसले

अनुराधा भोसले या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या एक महिला आहेत.

अनुराधा भोसले यांनी भंगार गोळा करणाऱ्या आणि लमाण समाजासारख्या इतर समाजांतील मुलांसाठी, आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी आतापर्यंत (नोव्हें. २०१३) ३६ शाळा सुरू केल्या आहेत. या शाळा चालविण्यासाठी त्यांनी आसपासच्या महाविद्यालयांतील होतकरू आणि समाजकार्याची आवड असणाऱ्या मुलां-मुलींना प्रशिक्षण देऊन तयार केले. त्या शाळांतील मुलांना शिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.

इ.स. २००५मध्ये अनुराधा भोसले यांनी अनाथ मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहात २०१३ सालच्या नोव्हेंबर महिन्यात ३७ मुले होती. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळाच पाहिजे अशा अट्टहासाने भोसले काम करतात.

अनुराधा भोसले यांना, त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा ’बाया कर्वे पुरस्कार’ मिळाला आहे.