अनुराधा टी.के.
अनुराधा टी.के. | |
जन्म | ३० एप्रिल, १९६० बंगलोर, म्हैसूर राज्य, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यसंस्था | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) |
अनुराधा टी.के. या निवृत्त भारतीय शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), विशेष संप्रेषण उपग्रहांच्या प्रकल्प संचालिका आहेत. त्यांनी जीसॅट-१२ आणि जीसॅट-१० या उपग्रहांच्या प्रक्षेपणावर काम केले आहे. १९८२ मध्ये स्पेस एजन्सीमध्ये सामील झालेल्या त्या इस्रोमधील सर्वात ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ आहेत.[१][२] आणि इस्रो मधील उपग्रह प्रकल्प संचालिका बनलेल्या त्या पहिल्या महिला आहेत.[३]
वैयक्तिक पार्श्वभूमी
अनुराधा टी.के. यांचा जन्म बंगळुरू, कर्नाटक येथे १९६१ मध्ये झाला. त्यांनी बेंगळुरू येथील युनिव्हर्सिटी विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर पदवी मिळवली. त्यांना विज्ञानात रस होता.[४] त्या नेहमी अंतराळ कार्यक्रमात सामील व्हायचे होते. त्यांनी मास्टर ऑफ सायन्सचा अभ्यास करण्यासाठी इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कडून ऑफर नाकारली.[५] अनुराधाला तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते आणि त्यांची आई गृहिणी होत्या. १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला तेव्हा त्या फक्त प्राथमिक शाळेत होत्या. पालकांनी त्यांना खूप प्रेरणा दिली. ते नेहमी चंद्र मोहिमेबद्दल खूप काही सांगत. आणि त्यांना आणि त्यांच्या बहिणीला हव्या असलेल्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि स्पर्धा करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या दोन बहिणी इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाल्या आणि दुसरी डॉक्टर झाली.
तसेच, अनुराधाने अशा कुटुंबात लग्न केले ज्यामध्ये प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक्सचे आकर्षण आहे. त्यांचे पती भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये महाव्यवस्थापक आहेत. त्यांची मोठी मुलगी यूएस मध्ये संगणक विज्ञान अभियंता आहे आणि त्यांची दुसरी मुलगी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. त्या म्हणतात, “माझे पती आणि सासरे नेहमीच सहकार्य करत होते, त्यामुळे मला माझ्या मुलांबद्दल फारशी काळजी करण्याची गरज नाही पडली.”[४]
कारकिर्द
त्यांच्या अनेक वर्गमित्रांपेक्षा वेगळे, त्यांनी कारकीर्द घडवण्यासाठी भारतात राहणेच पसंत केले. पहिली नोकरी बंगलोरमधील उपग्रह केंद्रात उपग्रहांची चाचणी होती आणि त्यांचे बॉस होते प्रो. यू.आर. राव, ज्यांनी नंतर १९८४ ते १९९४ पर्यंत एजन्सीचे अध्यक्ष म्हणून काम केले. अनुराधा यांनी उपग्रहांसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकसित केली. अनुराधा टीके या सर्वात वरिष्ठ महिला अधिकारी आहेत ज्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये ३४ वर्षे काम केले आहे. अनुराधा कामात आदर्श मानल्या जातात. त्या नेहमी म्हणायच्या “तुम्ही एक स्त्री आहात म्हणून तुम्हाला कोणतीही विशेष वागणूक मिळत नाही, तुम्ही स्त्री आहात म्हणून तुमच्याशी भेदभाव केला जात नाही. तुम्हाला इथे समान मानले जाते.". त्या म्हणतात "मला असे विषय कधीच आवडले नाहीत जिथे मला खूप काही लक्षात ठेवावे लागते आणि विज्ञान मला तर्कसंगत वाटले. भारतीय मुलींना विज्ञान हे त्यांच्यासाठी नाही असे वाटते आणि मला गणित हा त्यांचा आवडता विषय आहे यावर माझा विश्वास नाही." त्यांच्या उपग्रह प्रकल्प संचालकाने तिला खूप साहाय्य दिले. इतरांना असे वाटते की स्त्रिया आणि विज्ञान एकत्र येत नाहीत. [६] अनेक भारतीय अंतराळ कार्यक्रमांमध्ये स्तिया आघाडीवर आहेत. [७] [८]
अनुराधा यांचे विचार नावीन्यपूर्ण आहेत. त्यांनी जिओ-सिंक्रोनस उपग्रह नियंत्रित करण्याचा एक अनोखा मार्ग तयार केला आहे. अनुराधाने हसनमधील नियंत्रण सुविधेतून पार पाडलेल्या जटिल ऑपरेशन्सद्वारे जीसॅट-१२ ला त्याच्या अंतिम कक्षेत यशस्वीपणे चालवले. तिच्या इनोव्हेटनेच जीसॅट-१२ यशस्वी केले. त्यांची पद्धत आजही वापरली जाते. हसन येथे प्रथमच सर्व महिला संघाने काम केले होते. आणि म्हणूनच, स्पेस एजन्सीने आता त्यांच्यासाठी आणखी अनेक कार्ये तयार केली आहेत. प्रकल्प संचालक या नात्याने त्यांनी जीसॅट-९, जीसॅट-१७ आणि जीसॅट-१८ संप्रेषण उपग्रहांच्या प्रक्षेपणाचेही निरीक्षण केले. त्यांनी इंडियन रिमोट सेन्सिंग आणि इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम प्रोग्रामसाठी प्रोजेक्ट मॅनेजर, डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आणि असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. उपग्रह तपासण्याची प्रणाली ही त्यांची खासियत आहे जी एकदा अवकाशात गेल्यावर उपग्रहाच्या कामगिरीचे निरीक्षण करते.
पुरस्कार
- अंतराळ विज्ञान क्षेत्रातील सेवांसाठी २००३ चा स्पेस गोल्ड मेडल ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचा
- IEI च्या नॅशनल डिझाइन अँड रिसर्च फोरम नॅशनल डिझाईन अँड रिसर्च फोरम (NDRF) द्वारे २०११ सुमन शर्मा पुरस्कार
- २०१२ एएसआय- इस्रो मेरिट अवॉर्ड फॉर रिलायझेशन ऑफ इंडीजीनस कम्युनिकेशन स्पेसक्राफ्ट
- २०१२ इस्रो टीम अवॉर्ड २०१२ जीसॅट-१२ च्या अंमलबजावणीसाठी टीम लीडर म्हणून[७]
संदर्भ
- ^ "The women scientists who took India into space". BBC News (इंग्रजी भाषेत). 2016-12-12. 2017-03-04 रोजी पाहिले.
- ^ "Meet ISRO's 'Space Girls'". Deccan Herald. 5 August 2011. 2017-03-04 रोजी पाहिले.
- ^ Bihar Reporter. "Meet the lady behind success of RISAT I". The Biharprabha News (इंग्रजी भाषेत). 2017-04-04 रोजी पाहिले.
- ^ a b ISS. "Reaching out to the skies". indianspacestation.com (इंग्रजी भाषेत). 2 July 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-04 रोजी पाहिले.
- ^ "T K ANURADHA". 2014-02-21. रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-02-21. 2017-04-04 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "India's rocket women". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2017-02-26. 2017-03-04 रोजी पाहिले.
- ^ a b "Smt T K Anuradha – IEEE WIE Global Summit 2016". wiesummit.ieeer10.org (इंग्रजी भाषेत). 2017-03-04 रोजी पाहिले."Smt T K Anuradha – IEEE WIE Global Summit 2016". wiesummit.ieeer10.org. Retrieved 4 March 2017.
- ^ "Hands that rock the space missions at ISRO". The Week (इंग्रजी भाषेत). 2019-03-12 रोजी पाहिले.