अनीसा सय्यद
पदक माहिती | |||
---|---|---|---|
भारत या देशासाठी खेळतांंना | |||
कॉमनवेल्थ खेळ | |||
सुवर्ण | २०१० नवी दिल्ली | २५ मी एर पिस्तुल (जोड़ी) | |
सुवर्ण | २०१० नवी दिल्ली | २५ मी एर पिस्तुल (एकेरी) |
अनीसा सय्यद ( २२ सप्टेंबर १९८०) ही एक भारतीय महिला पिस्तुल नेमबाज असून तिने २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.२००६ साली तिने सॅफ स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकले. २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने २५ मीटर प्रक्षेपणामध्ये रौप्यपदक जिंकले.
सुरुवातीचे जीवन
अनीसा हिचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई गावात झाला. तिचे वडील अब्दुल हमीद सय्यद पुण्यातील टेल्को कंपनीत काम करायचे. ती चार भावंडांपैकी सर्वांत मोठी आहे. तिचे वडील क्लब-लेव्हलचे माजी फुटबॉल खेळाडू होते. कॉलेजमध्ये नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी) साठी प्रशिक्षण करताना अनीसाला शूटिंगमध्ये रस झाला.[१] अनीसाच्या पतीचे नाव मुबारक खान. त्यांना सन २०१७ मध्ये त्यांना कन्यारत्न झाले. सध्या २०१८ साली हे जोडपे हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात राहत आहे. सत्यव्रत दम हे तेथे तिचे प्रशिक्षक आहेत. त्यांनीच तिला सतत प्रेरित राहण्यास मदत केली.
कारकीर्द
अनीसा ही लेडी हवाभाई शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होती. त्यानंतर तिने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर तिकीट-कलेक्टर म्हणून काम केले. त्यापूर्वी ती महाराष्ट्रातील विले पार्ले रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वेसाठी काम करत होती. वारंवार बदली होत असल्याने तिने नोकरी सोडली आणि ती तिच्या पुण्याच्या घरी राहू लागली.
पुरस्कार
- अनीसाच्या शूटिंगच्या कारकिर्दीची सुरुवात गनी शेख आणि पी. व्ही. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली २००२मध्ये झाली. २५ मीटरच्या पिस्तुल प्रकारात अनीसा हिने राही सरनोबतसह पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तिने २६ जून २०१४ रोजी ग्लासगोजवळ बॅरी बगॉन शूटिंग सेंटरमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महिला २५ मीटर पिस्तुल प्रकारात रौप्य पदकही जिंकले.
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अनीसा हिने ७७६.५ गुणांसह वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. २००६मध्ये तिने सॅफ गेम्समध्ये सुवर्ण पदकही जिंकले. यासाठी तिला ॲंग्लियन मेडल हंट कंपनीकडून पाठिंबा मिळाला.
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "अनीसा सय्यद |इंग्लिश विकिपीडिया". en.wikipedia.org (इंग्लिश भाषेत). २०१८-१७-०६ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)