Jump to content

अनिश्चिततेचे तत्त्व

पुंज यामिकी मध्ये अनिश्चिततेचे तत्त्व हे एक मूलभूत तत्त्व आहे. या तत्त्वानुसार कोणत्याही कणाच्या भौतिक गुणधर्मांच्या मोजमापावर मूलभूत बंधने येतात. उदाहरणार्थ, एखाद्या कणाची गती आणि अवकाशातील त्याचे स्थान या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अचूकपणे मोजणे अशक्य आहे. जर त्या कणाचे स्थान अधिकाधिक अचुकतेणे मोजण्याचा प्रयत्न केला तर त्या कणाची गती (गतिपेक्षा संवेग हे या बाबतीत जास्त योग्य परिमाण आहे) तितकीच जास्त अनिश्चित होत जाईल. मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांमधील दोषांमुळे हे घडत नसून भौतिक कणांचा तो मुलभूत गुणधर्म आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मोजण्यासाठी संपुर्णपणे दोषरहित उपकरणे वापारली तरीही अनिश्चिततेची मर्यादा कमी करता येणे अशक्य आहे. १९२७ मध्ये वर्नर हायझेन्बर्ग यांनी हे तत्त्व मांडले आणि त्यानंतर काही दिवसांनी अर्ल हेस केनार्ड यांनी आणि १९२८ मध्ये हर्मन वाइल यांनी या तत्वाला काटेकोर गणितीय रूप दिले.

इतिहास

वर्नर हायझेन्बर्ग यांनी नील्स बोर यांच्या कोपनहेगन मधील संशोधन संस्थेमध्ये काम करत असताना अनिश्चितता तत्त्वाची पायाभरणी केली.