Jump to content

अनिल विश्वास

Anil Biswas (es); Anil Biswas (ast); Anil Biswas (ca); Anil Biswas (cy); Anil Biswas (sq); انیل بسواس (pnb); انیل بسواس (ur); Anil Biswas (tet); انيل بيسواس (arz); Anil Biswas (ace); अनिल विश्वास (hi); Anil Biswas (fi); Anil Biswas (map-bms); அனில் பிஸ்வாஸ் (இசையமைப்பாளர்) (ta); অনিল বিশ্বাস (bn); Anil Biswas (fr); Anil Biswas (jv); अनिल विश्वास (mr); Anil Biswas (pt); Anil Biswas (bjn); Anil Biswas (sl); Anil Biswas (pt-br); Anil Biswas (id); Anil Biswas (nl); അനിൽ ബിശ്വാസ് (ml); Anil Biswas (su); Anil Biswas (min); Anil Biswas (gor); ಅನಿಲ್ ಬಿಸ್ವಾಸ್ (kn); Anil Biswas (bug); Anil Biswas (en); Anil Biswas (ga); Анил Бисвас (ru); Anil Biswas (de) cantante indiano (it); ভারতীয় সুরকার (bn); chanteur indien (fr); India laulja (et); abeslari indiarra (eu); cantante indiu (ast); cantant indi (ca); Indian composer (en); cyfansoddwr a aned yn 1914 (cy); cantor indiano (pt); Indian composer (en-gb); آهنگساز و بازیگر هندی (fa); cântăreț indian (ro); pemeran asal India (id); cantante indio (gl); זמר הודי (he); Indiaas componist (1914-2003) (nl); këngëtar indian (sq); مغني هندي (ar); индийский музыкант (ru); amhránaí Indiach (ga); Indian composer (en); Indian singer (en-ca); ഇന്ത്യന്‍ ചലച്ചിത്ര അഭിനേതാവ് (ml); cantante indio (es) Бисвас, Анил (ru); अनिल बिस्वास (mr); Anil Krishna Biswas (en); Anil Biswas (ml); Anil Krishna Biswas (es)
अनिल विश्वास 
Indian composer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै ७, इ.स. १९१४
बरिशाल
मृत्यू तारीखमे ३१, इ.स. २००३
नवी दिल्ली
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९३२
नागरिकत्व
व्यवसाय
मातृभाषा
वैवाहिक जोडीदार
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अनिल विश्वास (बंगाली : অনিল বিশ্বাস ; रोमन लिपी : Anil Biswas; (जुलै ७, इ.स. १९१४; बरिशाल, पूर्व बंगाल, ब्रिटिश भारत - मे ३१, इ.स. २००३; नवी दिल्ली, भारत) हे बंगाली, भारतीय संगीतकार होते. प्रामुख्याने इ.स. १९३५ ते इ.स. १९६५ या कालखंडात संगीतकार म्हणून अनेक चित्रपटगीतांसाठी चाली बांधलेल्या बिस्वासांना भारतीय चित्रपटक्षेत्रात प्रथमच पाश्चात्त्य वृंदसंगीताचा वापर करण्याचे श्रेय दिले जाते[ संदर्भ हवा ].

जीवन

अनिल बिस्वास यांचा जन्म जुलै ७, इ.स. १९१४ रोजी वर्तमान बांगलादेशमधील बारिसाल गावी झाला. बारिसालमधेच जन्म झालेले बासरीवादक पन्नालाल घोष आणि ते जिवलग मित्र होते. प्रसिद्ध गायिका पारुल घोष ही अनिलदांची धाकटी बहीण आणि पन्नालाल यांची पत्नी होती.

कारकीर्द

कोलकाता येथे संगीतक्षेत्रात थोडे काम केल्यावर अनिलदा इ.स. १९३४ च्या सुमारास मुंबईला आले. इ.स. १९३५ पासून त्यांच्या संगीतकार म्हणून कारकीर्दीला प्रारंभ झाला. जागीरदार, अलीबाबा, औरत इत्यादी चित्रपटांना उत्तम संगीत देऊन त्यांनी १९४० पर्यंत छान ज़म बसवला. इ.स. १९४१ ते इ.स. १९५० या दशकात त्यांची प्रतिभा बहरत होती. सुरेंद्र, पारुल घोष, अख्तरी फ़ैज़ाबादी (बेगम अख्तर), अमीरबाई कर्नाटकी, खान मस्ताना, अरुण कुमार, पुढे सूफ़ी सन्त झालेले अश्रफ़ खान, सुरैया ही त्यांच्या संगीतावर गाणी गायलेल्या गायकांची ठळक नावे. स्वतः अनिलदा उत्तम गात. पाचव्या दशकाच्या उत्तरार्धात लता, मुकेश, तलत महमूद, मीना कपूर हे नवीन कलाकार त्यांच्या रचना गाऊ लागले होते. या कलाकारांबरोबर त्यांनी इ.स. १५५५-५६ पर्यंत अत्यंत दर्जेदार संगीत दिले. त्यानन्तर त्यांचा सिनेसृष्टीशी संबंध कमी होत गेला. इ.स. १९६०-६१ मधे मित्र पन्नालाल घोष, भाऊ सुनील बिस्वास, मुलगा प्रदीप बिस्वास यांच्या निधनामुळे अनिलदा खचले आणि मुंबई सोडून त्यांनी द्वितीय पत्नी मीना कपूर यांच्याबरोबर दिल्लीला मुक्काम हलवला. या दशकातल्या सौतेला भाई, छोटी छोटी बातें या चित्रपटांतल्या गाण्यांतही दादांच्या प्रतिभेचा प्रत्यय रसिकांना मिळतो. दिल्ली आकाशवाणीवर त्यांनी काही काळ काम केले.

मे ३१, इ.स. २००३ रोजी अनिल बिस्वास यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.

पगडा व प्रभाव

यशवंत देवांचे ते आवडते संगीतकार होतेच, शिवाय देवसाहेबांनी त्यांच्या मूळ हिंदी गाण्यांवर मराठी शब्द चढवून एक संग्रह काढला होता.

संकीर्ण

त्यांचे संगीतकार मित्र दत्ता कोरगावकर (के दत्ता) यांच्याकडे अनिल विश्वास यांची जन्मकुंडली होती, आणि तिच्यात त्यांची जन्मतारीख ७ जुलै, इ.स. १९१२ होती, असा उल्लेख आहे.

बाह्य दुवे

  • "अनिलबिस्वास.कॉम - स्मृतिपर संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)