Jump to content

अनिल धस्माना

अनिल धस्माना हे भारताच्या रिसर्च अँड ॲनॅलिसिस विंग या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख आहेत. त्यांनी डिसेंबर २०१६मध्ये हा पदभार स्वीकारला.

धस्माना हे मूळचे उत्तराखंड राज्यातील असून १९८१ तुकडीचे मध्य प्रदेश केडरमधील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली नियुक्ती इंदूरमध्ये सुपरिन्टेडेन्ट ऑफ पोलिस (एसपी) या पदावर झाली. १९८१ च्या दशकात इंदूरमधील सट्टा तसेच जुगार तसेच माफिया गुंडांना आळा घालण्यासाठी धस्माना यांनी ऑपरेशन बॉम्बे बाजार या नावाची धाडसी मोहीम हाती घेतली. या सफल कारवाई अंतर्गत इंदूरमध्ये अनेक दिवस संचारबंदी जारी होती.

धस्माना यांनी रॉमध्ये २३ वर्षे विविध पदांवर काम केले आहे. रॉच्या लंडन-फ्रांकफुर्ट तसेच युरोप आणि सार्क या विभागांची जबाबदारी त्यांनी प्रदीर्घ काळ सांभाळली आहे.

धस्माना हे अफगाणिस्तान, बलुचिस्तान तसेच इस्लामिक प्रश्‍न आणि दहशतवादी कारवाया यासंबंधातील तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या कार्यकालाच्या सुरुवातीस पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातली अस्थिरता हे मोठे प्रश्न आहेत.

म्हणजे धस्माना हे केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या खास विश्‍वासातील समजले जातात.