Jump to content

अनिल कांबळे

अनिल कांबळे (जन्म : सासवड, सन १९५३; - १ ऑगस्ट २०१९) हे एक नामवंत मराठी गझलकार कवी होते. 'रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी’ आणि ‘त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी’, 'तुला जर द्यायचे आहे तर ते प्रहर दे माझे', या त्यांच्या गाजलेल्या गझला होत्या. श्रीधर फडके यांनी 'त्या फुलांच्या' ही गझल स्वतःच्या आवाजात संगीतबद्ध केली होती. अनुप जलोटा, शंकर महादेवन, सलील कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर यांच्यासह अनेकांनी त्यांची गीते गायली होती, तर आनंद मोडक, यशवंत देव, श्रीधर फडके यांनी त्यांच्या गीतांना संगीत दिले होते.

अनिल कांबळे यांनी सुमारे ६०० भावगीते/गझला लिहिल्या असे सांगण्यात येते. अनिल कांबळे मूळ सासवडचे असल्याने, सासवडकर मंडळी दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी, म्हणजे १ ऑगस्टला कविसंमेलने आयोजित करतील.

अध्यक्ष-संस्थापक

कवी अनिल कांबळे हे अभिजात कला अकादमी अध्यक्ष आणि युनिव्हर्सल पोएट्री फाऊंडेशनचे संस्थापक होते. ते 'अक्षर अयान' नावाच्या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादकही होते.

अनिल कांबळे यांच्या गाजलेल्या गझला/भावगीते

  • अशा या सांजवेळेला सुखाचा गंध हा आला (भावगीत, गायिका : रंजना जोगळेकर, संगीत : आनंद मोडक)
  • आज एकांतात हळवी वेदना गंधीत झाली (भावगीत, गायिका : पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संगीत : आनंद मोडक)
  • त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी (भावगीत, गायक/संगीतकार : श्रीधर फडके; राग : शिवरंजनी)
  • दूर रानातून हलके बासरचा सूर आला (भावगीत, गायिक : अनूप जलोटा, संगीत : आनंद मोडक)
  • रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी (भावगीत, गायिक : सुरेश वाडकर, संगीत : श्रीधर फडके)
  • ही अशी कोशात अपुल्या हिंडणारी माणसे (भावगीत, गायिक : श्रीकांत पारगावकर, संगीत : अरुण काकतकर)

पुरस्कार

आचार्य अत्रे प्रत़िष्ठानने दरवर्षी 'अनिल कांबळे काव्य पुरस्कार' देण्याचे ठरवले आहे.