Jump to content

अनिकेत विश्वासराव

अनिकेत विश्वासराव
जन्म ७ मे, १९८१ (1981-05-07) (वय: ४३)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषामराठी
प्रमुख चित्रपटफक्त लढ म्हणा
प्रमुख टीव्ही कार्यक्रमकळत नकळत, नायक

अनिकेत विश्वासराव (७ मे १९८१) [ संदर्भ हवा ] हा एक मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका माध्यमांतील अभिनेता आहे. मराठी सिनेमातील त्यांच्या कामाबद्दल तो सर्वज्ञात आहे. त्याने सुधीर मिश्राच्या चमेलीमधून स्क्रीनवर पदार्पण केले आणि लपून छपून (२००७) या मराठी सिनेमात पदार्पण केले. २०२१ मध्ये त्यांनी फक्त लढ म्हणा चित्रपटाच्या प्रसिद्धीसह लोकप्रियता प्राप्त केली.

जीवन

अनिकेत विश्वासराव याचे शालेय शिक्षण मुंबईत बोरीवली येथील सेंट फ्रान्सिस दि असिसी हायस्कुलात झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण पार्ल्यातल्या म.ल. डहाणूकर महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असताना त्याने नाट्यस्पर्धांमधून अभिनयासाठीची पारितोषिके मिळवली.

कारकीर्द

अनिकेत विश्वासराव याचे व्यावसायिक अभिनयक्षेत्रातील पदार्पण नकळत सारे घडले या नाटकाद्वारे झाले. त्यानंतर त्याला त्याची पहिली दूरचित्रवाणी मालिका नायक यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. पुढील काळात त्याने ऊन-पाऊस, कळत नकळत या मालिकांतून भूमिका साकारल्या.

चित्रपट-कारकीर्द

वर्षचित्रपटभाषाभूमिकाटिप्पणी
२००३चमेलीहिंदीराजा
२००४हवा आने देहिंदीअर्जुन
२०११फक्त लढ म्हणामराठीॲलेक्स
२०१२स्पंदनमराठी
नो एंट्री: पुढे धोका आहेमराठीसनी"नो एंट्री" या हिंदी चित्रपटाची मराठी पुनर्निर्मिती

बाह्य दुवे