अनावृत्तबीजी वनस्पती
अनावृतबीजी वनस्पती (इंग्लिश:जिम्नोस्पर्म) ज्या संवहनी वनस्पतींची बीजे उघडी असतात आणि ज्या बीजांद्वारे पुनरुत्पादन घडून येते, त्यांना ‘अनावृतबीजी’ वनस्पती म्हणतात. अनेक अनावृतबीजी वनस्पतींची बीजे शंकुमध्ये निर्माण होतात आणि पक्व होईपर्यंत दिसून येत नाहीत. कोनिफरोफायटा, सायकॅडोफायटा, गिंगोफायटा आणि निटोफायटा असे त्यांचे चार विभाग असून ८८ प्रजातीत सु. १,००० जाती जगात विखुरलेल्या आहेत. सर्व अनावृतबीजी वनस्पतींमध्ये, वनस्पतींचे दृश्य शरीर (वाढणारे खोड आणि फांद्या) बीजाणुउद्भिद किंवा अलैंगिक पुनरुत्पादन दर्शवतात. सामान्यपणे बीजाणुउद्भिदाला खोड असून त्याला मुळे व फांद्या, तसेच प्रजननक्षम संरचना असतात. संवहनी वनस्पतींप्रमाणेच, या वनस्पतींमध्ये काष्ठ ऊती व अधोवाही ऊती असतात. काष्ठ ऊती वनस्पतीच्या सर्व भागांकडे पाणी व खनिजे वाहून नेतात, वनस्पतीला आधार देतात, तर अधोवाही ऊती पानांमध्ये तयार झालेली शर्करा, ॲमिनो आम्ले आणि कार्बनी पोषकद्रव्ये यांची वाहतूक करतात.[१]
संदर्भ
- ^ "वनस्पतिसृष्टी (Plant kingdom)". मराठी विश्वकोश. ३० सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.