Jump to content

अनागरिक

ज्या बौद्ध तरुण व्यक्तीने भिक्खू कडून त्रिशरणसह अष्टशीलाचे किंवा दसशील पाळण्याचे जीवनभर व्रत धारण केले आहे; ज्यांनी घरदार त्यागून जनकल्याण सेवेचे जीवनभर व्रत घेतलेले असते त्यांना अनागरिक तर स्त्रियांना अनागरिका म्हणतात. ही अवस्था श्रामणेराच्या अगोदरची आहे.

अनागरिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र अंगावर धारण केलेले असते. ते जीवनभर शुभ्र वस्त्राशिवाय दुसरे वस्त्र वापरत नाहीत.

श्रीलंकेचे अनागारिक धम्मपाल यांनी जीवनभर अनागारिकेतेचे व्रत घेतले होते.