अनवलोभन
अनवलोभन (न अवलुप्यते गर्भोऽनेन)) हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी तिसरा संस्कार असून पुंसवन कर्मासारखाच करावयाचा हा संस्कार आहे. हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर तिसऱ्या महिन्यात करावा. आश्वलायन गृह्यसूत्रांत पुंसवन संस्कारानंतर हा संस्कार सांगितला आहे. विर्व्यवान,पराक्रमी तथा इंद्रीयविजयी संतती निर्माण व्हावी असा या संस्कारामागचा अर्थ आहे.
पद्धती
या संस्कारात अश्वगंधा वनस्पती चे फार महत्त्व आहे. आयुर्वेदिक उपचारांमधील ही महत्त्वाची वनस्पती आहे. अश्वगंधा या वनस्पतीला योग्य ते आवाहन करून माहं पौत्रमघं नियां या मंत्राचा मंत्रोच्चार करत वनस्पतीचा रस पतीनें पत्नीच्या तिच्या उजव्या नाकपुडींत सोडावा.
फायदे
अनवलोभन संस्कारापासून तीन हेतु साध्य होतात.
- गर्भ बलवान होतो,
- गर्भपाताची शक्यता कमी होते.
- मूल दिवस पुरे झाल्यानंतर जन्म पावते. हा संस्कार पतीने, किंवा तो नसेल तर दीर इत्यादिकांनीं केला तरी चालतो.
हिंदू धर्मातील सोळा संस्कार |
---|
गर्भाधान · पुंसवन · अनवलोभन · सीमंतोन्नयन · जातकर्म · नामकरण · सूर्यावलोकन · निष्क्रमण · अन्नप्राशन · वर्धापन · चूडाकर्म · अक्षरारंभ · उपनयन · समावर्तन · विवाह · अंत्येष्टी |