अनघा देशपांडे
अनघा अरुण देशपांडे ( १९ नोव्हेंबर, इ.स. १९८५:सोलापूर, महाराष्ट्र) ही भारत क्रिकेट संघाची एक सदस्य आहे. यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज अशी तिची संघातील भूमिका आहे. ९ मे २००८ रोजी पाकिस्तान महिला संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्याद्वारे पदार्पण केलेल्या अनघाने ६ मार्च २०१० पर्यंत १२ एकदिवसीय आणि ७ टी२० सामन्यांमध्ये भाग घेतलेला आहे.