अनंत सामंत
अनंत सामंत | |
---|---|
जन्म | १२ ऑगस्ट १९५२ अर्नाळा, मुंबई |
[१][२][३][४][५][६]अनंत सामंत हे एक सुप्रसिद्ध मराठी लेखक आहेत.
अनंत सामंत यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी मुंबईजवळच्या अर्नाळा इथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण परळच्या आर.एम.भट्ट हायस्कुल मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कच्या इन्स्टिटयूट ऑफ कॅटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन मध्ये प्रवेश घेतला व डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पूर्ण केला.[ संदर्भ हवा ] या क्षेत्रात काही वर्षे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नोकरी केली. MTDC मध्ये टुर मॅनेजर म्हणून देखील काम केले. त्यानंतर त्यांचा जहाजावरील प्रवास सुरू झाला. हॉटेल मॅनेजमेन्ट च्या जोरावर ते चीफ स्टुवर्ड म्हणून जहाजावर गेले व नंतर क्षेत्र बदलून नेव्हिगेटिंग ऑफिसर झाले. काही वर्षातच नोकरी सोडली आणि इंटेरियर डेकोरेशन, कन्स्ट्रक्शन वगैरे क्षेत्रात मुसाफिरी करत राहिले.[ संदर्भ हवा ] लेखक होणं काही ठरवलेलं नव्हतं. परंतु जहाजावरील भ्रमंतीने आलेले अनुभव आणि भेटलेली माणसे यांच्यामुळे लेखनाला सुरुवात झाली. "एम टी आयवा मारू" च लिहून ठेवलेलं बाड बरीच वर्षे तसेच पडून होतं. मित्राच्या आग्रहावरून १९८९ साली ते प्रसिद्ध केलं आणि त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरूच झाला तो एकदम हिट कलाकृतीने.[ संदर्भ हवा ] सागरी जीवनावरील या कादंबरीने तरुणांना वेड लावलं. आज ३० पेक्षा जास्त वर्षे होऊन देखील तिची लोकप्रियता कमी झाली नाही आणि नवीन आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. इतकेच नाही तर जागतिक स्तरावरील वाचकांसाठी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद श्री. प्रशांत पेठे यांनी केला आणि तो २०१५ साली पेंग्विन (UK )नि प्रकाशित केला.[ संदर्भ हवा ]
आतापर्यन्त त्यांची २० च्या आसपास पुस्तके प्रकाशित झाली असून काहींवर आधारित चित्रपट आणि नाटके देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.[ संदर्भ हवा ]
अनंत सामंत यांनी लिहिलेली पुस्तके[ संदर्भ हवा ]
- अविरत - १९९३ (आवृत्ती संपली )
- अश्वत्थ (कादंबरी) (अविरतची सुधारित आवृत्ती )
- एक ड्रीम..., मायला ! (कथासंग्रह)
- एम टी आयवा मारू (कादंबरी) -१९८९[७]
- ऑक्टोबर एंड (कादंबरी) - ऑगस्ट १९९९
- Aiwa Maru (मूळ मराठी कादंबरी - एम टी आयवा मारू; इंग्रजी अनुवादक - प्रशांत पेठे) - २०१५
- ओश्तोरीज (कादंबरी) - ऑगस्ट २०००
- एका शहराचं शूटिंग (कथासंग्रह)
- किबुत्झमधला डॅनी इथे आला होता (कथासंग्रह) - फेब्रुवारी २००३
- के फाईव्ह (कादंबरी) - ऑगस्ट १९९९
- त्रिमाकासी मादाम! (कादंबरी) - १९९५
- दार चौकट आणि बोटं (कथासंग्रह)
- दृष्टी (कादंबरी)
- बायपासचे दिवस (आरोग्यविषयक)
- बेलिन्दा (कथासंग्रह) - मार्च २००१
- मितवा (कादंबरी) - नोव्हेंबर २००४
- लांडगा (कादंबरी) - सप्टेंबर १९९९
- लिलियनची बखर (ऐतिहासिक)
- सॅलिटेअर
- माईन फ्रॉइण्ड - मे २००८
- फ्रंट लाईन स्टोरी - जून २००१
अनंत सामंत यांना मिळालेले काही पुरस्कार[ संदर्भ हवा ]
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे "दि.बा.मोकाशी " पुरस्कार
- "वा.म.जोशी" पुरस्कार -१९८९
- "महाराष्ट्र राज्य पुरस्कार" १९८९-९०, ९८-९९, ९९-२०००, २००९-१०
- "ना.सी.फडके" पुरस्कार -१९९६
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा "आनंदीबाई शिर्के" पुरस्कार -१९९८
- यशवंराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक) यांचा "बाबुराव बागूल" गौरव पुरस्कार -१९९९
- एकूण कथावाङ्मयासाठीचा "अ.वा. वर्टी" पुरस्कार -२००१
- "पु.ना.पंडित" पुरस्कार -२००१
- "पु.भा.भावे" महाराष्ट्र राज्य पुरस्कार -२००१
- मुंबई मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट कादंबरीसाठी "चंद्रकांत भोगटे" पुरस्कार -२००२
- "बापूरावजी देशमुख स्मृती कथासंग्रह पुरस्कार" वर्धा -२००२
- संस्कृती कलादर्पण पुरस्कार -२००९ (चित्रपट -वावटळ)
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "El realismo mágico de la novela india 'Aiwa Maru' se abre a Occidente". La Vanguardia (स्पॅनिश भाषेत). 2015-07-19. 2022-09-23 रोजी पाहिले.
- ^ Lokapally, Vijay (2015-06-17). "The ship creates a storm" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
- ^ "Third Week Of "Sea Readings" At SAPP...Feel The Sea In Literature From India And Abroad... : www.MumbaiTheatreGuide.com". www.mumbaitheatreguide.com. 2022-09-23 रोजी पाहिले.
- ^ "मराठी साहित्यातला समुद्र इंग्रजीत". Maharashtra Times. 2022-09-23 रोजी पाहिले.
- ^ "Cult Marathi novel now in English".
- ^ "Cult Marathi novel now in English".
- ^ आयवा मारूचे परीक्षण