अनंत लाभसेटवार
डाॅ. अनंत पां. लाभसेटवार हे एक मराठी लेखक आहेत. मुळचे नागपूरचे असलेल्या डॉ. अनंत व लता लाभसेटवार यांच्या नावाचा न्यास आणि अमेरिकेत एक डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान नावाचा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार अच्युत गोडबोले (२०१५), अरुणा ढेरे (?), आनंद यादव (२००५), भारत सासणे (२०१२), भालचंद्र नेमाडे (२००३), मधु मंगेश कर्णिक ( ), राजन गवस (२००७), डाॅ. रवींद्र शोभणे ( ), विंदा करंदीकर ( ), विश्वास पाटील (२००९), डाॅ. श्रीकृष्ण राऊत (२००२) यांना मिळाला आहे.
पुस्तके
- अमेरिका : दशा व दिशा (वैचारिक)
- अमेरिकेच्या दुर्बिणीतून भारत (लेखसंग्रह)
- अमेरिकेतील पापनगरी : एक वारी (माहितीपर प्रवासवर्णन)
- अमेरिकेतील वाटचाल (आत्मकथन)
- अमेरिकेतील वाटचाल (माहितीपर)
- घरट्यापलीकडे (कथासंग्रह)
- चीनमधील चैन (माहितीपर प्रवास)
- झोके अमेरिकेतले (प्रवासवर्णन)
- ट्रंप (चरित्र)
- डॉलर्सच्या फुलवाती (माहितीपर)
- तरंग (कथासंग्रह)
- पराकाष्ठा (कादंबरी)
- बिल गेट्स (व्यक्तिचित्रण)
- बिल गेट्स : संगणक प्रणालीचा राजा (चरित्र)
- विवाहिता (कादंबरी)
- विश्व भटकंती (प्रवासवर्णन)
- विश्वसंचारी (प्रवास वर्णन)
- सत्यमेव जयते (?)
- स्टीव्ह जॉब्स (व्यक्तिचित्रण)
- हुंकार (कथासंग्रह)