अनंत रामचंद्र कुलकर्णी
अ.रा.कुलकर्णी | |
---|---|
जन्म नाव | अनंत रामचंद्र कुलकर्णी |
जन्म | १९ एप्रिल, १९२५ दड्डी , बेळगाव , कर्नाटक (तत्कालिन मुंबई प्रांत) |
मृत्यू | २४ मे , २००९ |
शिक्षण | एम.ए. , पीएच.डी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदु |
कार्यक्षेत्र | इतिहास संशोधन |
विषय | इतिहास |
प्रसिद्ध साहित्यकृती | शिवकालीन महाराष्ट्र मराठ्यांचे इतिहासकार |
वडील | रामचंद्र कुलकर्णी |
पत्नी | विजया कुलकर्णी |
अ.रा. ऊर्फ अनंत रामचंद्र कुलकर्णी हे एक इतिहास संशोधक होते. ते पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे संस्थापक प्रमुख तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरूही होते.[ संदर्भ हवा ]
अ.रा. कुलकर्णी यांच्या प्रयत्नामुळे डेक्कन महाविद्यालयाशी संलग्न असलेला इतिहास विभाग इ.स. १९६९ साली पुणे विद्यापीठात आला. तेव्हापासून इ.स. १९८८ पर्यंत अ.रा. या विभागाचे प्रमुख होते.[ संदर्भ हवा ]
कुलकर्णी मूळचे सोलापूर जिल्ह्यातील. मुंबई विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्या वेळेसचे 'मराठवाडा विद्यापीठ' (सद्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), औरंगाबाद येथून त्यांनी पीएच. डी. घेतली.[ संदर्भ हवा ] इतिहास संशोधनासाठी ते लंडनच्या 'स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रीकन स्टडीज', जर्मनीतील हायडलबर्ग आणि पॅरिस येथेही गेले होते. लंडनमधील संशोधनाच्या आधारे त्यांनी ग्रॅंट डफ याच्यावरील ग्रंथाचे लेखन केले.[ संदर्भ हवा ]
ग्रंथसंपदा [ संदर्भ हवा ]
मराठी
- शिवकालीन महाराष्ट्र , १९९३
- अशी होती शिवशाही , १९९९
- पुण्याचे पेशवे , १९९९
- कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी) , २००२
- जेम्स कनिंगहॅम ग्रॅट डफ , २००६
- जेधे शकावली करीना , २००७
- आज्ञापत्र , २००३
- मध्ययुगीन महाराष्ट्र
- मराठे व महाराष्ट्र , २००७
- गेले ते दिन , २००६
- मराठ्यांचे इतिहासकार (इतिहासलेखन पद्धती) , २००७
- परशराम चरित्र (सहसंपादक - नरेंद्र वागळे)
- पेशव्यांची बखर (सहसंपादक - वि.म.कुलकर्णी, अ.ना.देशपांडे)
- मराठ्यांचा इतिहास खंड १ (सहसंपादक - गणेश हरी खरे)
- मराठ्यांचा इतिहास खंड २ (सहसंपादक - गणेश हरी खरे)
- मराठ्यांचा इतिहास खंड ३ (सहसंपादक - गणेश हरी खरे)
- महाराष्ट्र : समाज आणि संस्कृती
- मेस्तर चारलस डोयवा साहेब फ्रान्सीस
- मराठ्यांचा इतिहास : साधन परिचय (सहसंपादक - म.रा.कुलकर्णी, )
- महात्मा जोतीराव फुले
हिंदी[ संदर्भ हवा ]
- शिवाजी के समय का महाराष्ट्र, २०००
- जेम्स कनिघम ग्रांट डफ , २००५
इंग्रजी[ संदर्भ हवा ]
- Maharashtra in the Age of Shivaji , 1969
- The Marathas 1600-1848
- Medieval Maharashtra
- Medieval Maratha Country
- Maharashtra : Society and Culture
- History in Practice
- Region, Religion and Nationalism (Co.Ed. N.K.Wagle)
- History of Modern Deccan Vol.1 (Co.Ed. M.A.Nareem)
- Medieval Deccan History (Commemoration Volume in honour of Pushottam Mahadeo Joshi) ( - Co.Ed. M.A.Nayeem , T.R.De souza) , 2002
- James Cuninghame Grant Duff
- Maratha Historiography
इतर[ संदर्भ हवा ]
- Studies in History of the Deccan : Medieval and Modern (Professor A.R.Kulkarni Felicitation Volume) - M.A.Nayeem , Aniruddha Ray , K.S.Mathew , 2002