अनंत पुरुषोत्तम मराठे
अनंत मराठे (जन्म : पुणे, इ.स. १९३६; - इ.स. २००२) हे एक हिंदी-मराठी नाट्य-चित्र अभिनेते होते. त्यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. वडील वारल्यानंतर अनंत मराठे यांना वयाच्या ४थ्या वर्षी शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबीयांसह मुंबईला आले. त्यांचे बोलके डोळे आणि निष्पाप चेहरा पाहून मास्टर विनायक यांनी त्यांना त्यांच्या 'छाया' या चित्रपटासाठी बालकलावंत म्हणून घेतले. त्यानंतर पुढे साठ वर्षे अनंत मराठे यांची अभिनयाची कारकीर्द चालूच राहिली. ते गायकही होते. रामशास्त्री चित्रपटात त्यांच्या छोट्या रामची भूमिका अतिशय गाजली. ती करत असताना त्यांनी म्हटलेले 'दोन घडीचा डाव' हे गाणे अजरामर झाले. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत दाखवला गेला.
एव्हीएम, जेमिनी हे मद्रासमधील फिल्म स्टुडिओ त्याकाळी सामाजिक-पौराणिक चित्रपट बनवायचे. त्यांनी त्यांच्या हिंदी चित्रपटांसाठी अनंत मराठे यांना कामे द्यायला सुरुवात केली. अशीच कामे करत करत त्यांनी आयुष्भरात २५०हून अधिक हिंदी-मराठी-गुजराती चित्रपटांतून कामे केली..
अनंत मराठे यांची भूमिका असलेले चित्रपट
- गीता (हिंदी)
- गोकुल (हिंदी)
- चोरावर मोर
- छाया (बालनट)
- संत जनाबाई
- जावई माझा भला
- जिवाचा सखा
- नंदकुमार
- बडा भाई (हिंदी)
- बरखा (हिंदी)
- बिजली (भूमिका आणि दिगदर्शन)
- भक्त बिल्वलमंगलम (हिंदी)
- भक्त गोपालभैय्या (हिंदी)
- भरतमिलाप
- भिंतीला कान असतात
- मालती माधव
- रामशास्त्री (छोटा राम)
- शहीद (हिंदी, राजगुरूची भूमिका)
- संपूर्ण रामायण
- संस्कार (हिंदी)
- सीता स्वयंवर
- सोनारानं टोचले कान
- हमारी याद आयेगी (हिंदी)
अनंत मराठे यांना मिळालेले पुरस्कार
- रामशास्त्रीतील भूमिकेसाठी बंगाल फिल्म पत्रकार संघटनेचा त्यावर्षीचा उत्कृष्ट साहाय्यक अभिनेता पुरस्कार.
- रंगत-संगत प्रतिष्ठानचा माणूस पुरस्कार
(अपूर्ण)