Jump to content

अनंत नातू

मेजर जनरल अनंत विश्‍वनाथ नातू (१ सप्टेंबर, इ.स. १९२५:अकोला, महाराष्ट्र - २० जानेवारी, इ.स. २०१६:पुणे, महाराष्ट्र) हे भारतीय सेनेमधून निवृत्त झालेले अधिकारी होते.

अनंत नातू हे इ.स. १९४६मध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये फ्रंटियर फोर्स रायफलमध्ये रुजू झाले. स्वातंत्र्यानंतर त ९-गुरखा रायफलच्या पहिल्या बटालियनमध्ये आले. पाकिस्तानने १९७१ मध्ये भारतातल्या जम्मूमधील पूॅंछ भागात केलेल्या जोरदार आक्रमणाला नातूंच्या तुकडीने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्या वेळी त्यांनी ९३-इन्फंट्रीचे नेतृत्व केले होते. या युद्धात दाखविलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल त्यांना महावीर चक्र प्रदान करून गौरविण्यात आले होते.

१९७३मध्ये मिळालेल्या पदोन्नतीने अनंत नातू मेजर जनरल झाले.

लष्करातून निवृत्त झाल्यानंतर नातूंनी मालेगाव येथे सामाजिक कार्यात भाग घेतला. ग्राहक पंचायत, माजी सैनिक कल्याण आणि पर्यावरण-रक्षण यांत ते सक्रिय होते.