अनंत नाग
अनंत नाग | |
---|---|
अनंत नाग (२०१७) | |
जन्म | ४ सप्टेंबर, १९४८ शिराली, म्हैसूर राज्य, भारत |
कार्यक्षेत्र | अभिनेते, राजकारणी |
कारकीर्दीचा काळ | १९७३–आजतागायत |
पुरस्कार | फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण राज्योत्सव प्रशस्ती (२०१७) |
पत्नी | गायत्री नाग (ल. १९८७) |
नातेवाईक | शंकर नाग (भाऊ) अरुंधती नाग |
अनंत नागरकट्टे उर्फ अनंत नाग (जन्म:४ सप्टेंबर, १९४८) हे एक भारतीय अभिनेते आहेत विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीत यांचे मोठे योगदान आहे.[१] त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात २०० हून अधिक कन्नड चित्रपट असून, सोबत हिंदी, तेलुगू, मराठी, मल्याळम आणि इंग्रजी चित्रपटांचा देखील समावेश आहे.[२] [३] चित्रपटा व्यतिरिक्त त्यांनी रंगमंचावरील नाटके, समांतर सिनेमा [३] आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्ये देखील काम केले आहे.[४][१][५][६]
प्रा. प.वि. नंजराज दिग्दर्शित संकल्प (१९७३) या चित्रपटातून नाग यांनी आपल्या चित्रपटाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. संकल्प चित्रपटाने कर्नाटकात सात राज्य पुरस्कार जिंकले. श्याम बेनेगल यांच्या अंकुर (१९७४) या चित्रपटातून त्यांनी समांतर सिनेमात प्रवेश केला.[७][८] ना निन्ना बिदलारे (१९७९), चंदनदा गोम्बे (१९७९), बेंकिया बढे (१९८३), हेंडथिगे हेलबेडी (१९८९), गणेशना मदुवे (१९९०), गोवरी गणेशा (१९९१), मुंगारू माले (२००६) व गोधी बन्ना साधराना मिकट्टू (२०१६) हे त्यांचे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी कन्नड चित्रपट आहेत. [९]
इस १९८६ मध्ये आरके नारायण यांच्या कथांवर आधारित दूरदर्शनवरील[१०] प्रसारित मालिका मालगुडी डेजमध्ये त्यांनी अभिनय केला. नाग यांनी सहा दक्षिणेचे फिल्मफेअर पुरस्कार आणि पाच कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार मिळवले आहेत. ते प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते शंकर नाग यांचे मोठे भाऊ आहेत.
प्रारंभिक जीवन
अनंत नाग यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४८ रोजी कोकणी कुटुंबात आनंदी आणि सदानंद नागरकट्टे यांच्या घरी शिराली, भटकळ तालुक, कर्नाटक येथे झाला, जिथे त्यांनी त्यांच्या बालपणाचा काळ व्यतीत केला.[११] नाग यांना एक मोठी बहीण, श्यामला आणि एक धाकटा भाऊ शंकर नाग आहेत.[१२]
नाग यांनी त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण अज्जरकड, उडुपी येथील कॅथोलिक शाळेत, दक्षिण कन्नडमधील आनंदाश्रमात आणि पूर्वीच्या म्हैसूर राज्यातील (आता कर्नाटक) उत्तरा कन्नड जिल्ह्यातील चित्रापूर मठात केले.[१३] इयत्ता ९वीत असताना त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवण्यात आले. [१४] त्यांना भारतीय सेनेत सामील व्हायचे होते, परंतु कमी वजनामुळे भारतीय सेनेने आणि दृष्टी कमी असल्यामुळे भारतीय वायुसेनेने त्यांना प्रवेश नाकारला.[१५] नंतर ते मुंबईच्या नाट्यचळवळीकडे ओढले गेले आणि कोकणी, कन्नड आणि मराठी भाषेतील नाटकांमध्ये त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली जी त्यांनी २२ वर्षांपर्यंत टिकवली.[२]
अभिनयाची कारकीर्द
रंगमंच
अनंत नाग यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबईत कन्नड आणि कोकणी नाटकांमधून केली. त्यांनी सत्यदेव दुबे, गिरीश कर्नाड आणि अमोल पालेकर यांच्या नाटकात काम केले . [१६][१७] सुमारे पाच वर्षे त्यांनी कोकणी, कन्नड, मराठी आणि हिंदी नाटकांतून भूमिका केल्या.[१८]
चित्रपट आणि दूरदर्शन
मुंबईतील नाट्य कारकिर्दीनंतर, नागने १९७३ च्या संकल्प या कन्नड चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. नाग नंतर समांतर सिनेमाचा मुख्य भाग बनले, ज्यामुळे ते १९७० आणि १९८० च्या दशकात अभिनयाच्या शिखरावर होते.[१९] थिएटर दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याशी ओळख करून दिल्या नंतर, त्यांनी बेनेगलच्या पुढील चित्रपटांमध्ये काम केले: अंकुर (१९७४), निशांत (१९७५), मंथन (१९७६), कोंडुरा (१९७८), भूमिका (१९७८) आणि कलयुग (१९८१).[३]
जी व्ही अय्यर यांच्या हमसागीते (१९७५) द्वारे कन्नड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटात नाग यांनी कर्नाटकी गायनाच्या शिष्याची भूमिका केली आहे. या चित्रपटाने कन्नडमधील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.[२०]
नंतर अनंत नाग यांनी १९८६ मध्ये मालगुडी डेज या दूरचित्रवाणी मालिकेच्या १३ भागांमध्ये काम केले. ही मालिका आर के नारायण यांच्या कथांवर आधारित होती आणि या मालिकेचे दिग्दर्शक त्यांचे भाऊ शंकर नाग हे होते.[२१]
'गोधी बन्ना साधना मायकट्टू' (२०१६) या कन्नड चित्रपटातील अल्झायमर रुग्णाच्या त्यांच्या भूमिकेला समीक्षकांची चांगली प्रशंसा मिळाली. हा प्रायोगिक चित्रपट त्यांना एक मोठे व्यावसायिक यश देऊन गेला.[२२][२३][२४]
वैयक्तिक आयुष्य
नागने ९ एप्रिल १९८७ रोजी अभिनेत्री गायत्रीशी लग्न केले.[२५] त्यांना अदिती नावाची एक मुलगी आहे.
राजकीय कारकीर्द
नाग कर्नाटकातील विधान परिषदेचे आमदार आणि जेएच पटेल सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी बंगळुरूचे शहरी विकास मंत्री म्हणून काम केले.[२६] २००४ मध्ये, त्यांनी चामराजपेट मतदारसंघ, जनता दल (धर्मनिरपेक्ष) कडून बंगळुरू विधानसभा निवडणूक लढवली. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एसएम कृष्णा आणि भारतीय जनता पक्षाचे सहकारी अभिनेते मुख्यमंत्री चंद्रू यांच्या विरोधात ते उभे होते.[२७]
चित्रपट सूची
पुरस्कार
वर्ष | पुरस्कार प्रकार | चित्रपट | संदर्भ |
---|---|---|---|
१९७९-८० | सर्वोत्कृष्ट अभिनेता | मिंचिना ओटा | |
१९८५-८६ | होसा नीरू | ||
१९८७-८८ | अवस्थे | ||
१९९४-९५ | गंगाव्वा गंगामयी | ||
2011-12 | विष्णुवर्धन पुरस्कार डॉ | जीवनगौरव | [२८] |
वर्ष | पुरस्कार प्रकार | चित्रपट | निकाल |
---|---|---|---|
1977 | सर्वोत्कृष्ट अभिनेता | प्रेमा लेखलू | नामांकन |
१९७९ | ना निन्ना बिदलारे | विजयी | |
1982 | बारा | विजयी | |
1989 | हेंडथिघेलबेडी | विजयी | |
१९९० | उदभव | विजयी | |
1991 | गौरी गणेशा [२९] | विजयी | |
2016 | गोधी बनना साधना मयकट्टू | विजयी | |
2008 | सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता | ताज महाल | नामांकन |
अरमाने | नामांकन | ||
2015 | वास्तु प्रकारा | नामांकन |
संदर्भ
- ^ a b "Versatile Veteran". Deccan Herald. 10 March 2012.
- ^ a b "Films were bolder in the past". Frontline. October 2013. 5 October 2013 रोजी पाहिले.
- ^ a b c "'An actor should be like water, ego-less':An interview with Kannada icon Anant Nag". Scroll. 8 October 2017.
- ^ "Anant Nag returns to small screen". The Hindu. 10 July 2013.
- ^ "A brilliant 'NAG'otiator". Deccan Chronicle. 7 September 2016.
- ^ "An ode to the supporting actor". Deccan Herald. 17 April 2020.
- ^ "Ankur (1974)". The Hindu. 23 September 2012.
- ^ "HT Brunch Cover Story: Over the top and on point with Shyam Benegal". Hindustan Times. 11 October 2019.
- ^ "'An actor should be like water, ego-less':An interview with Kannada icon Anant Nag". Scroll. 8 October 2017."'An actor should be like water, ego-less':An interview with Kannada icon Anant Nag". Scroll. 8 October 2017.
- ^ "Malgudi Days to Karamchand – the Doordarshan classics that deserve a lockdown comeback". The Print. 25 April 2020.
- ^ "About real life and reel lives". The Times of India. October 2010. 9 March 2014 रोजी पाहिले.
- ^ "A stroll down memory lane". Deccan Herald. 30 November 2015.
- ^ "I used to spin charakha daily for an hour at Ananda Ashram: Anant Nag". Star of Mysore. 15 February 2020.
- ^ "About real life and reel lives". The Times of India. October 2010. 9 March 2014 रोजी पाहिले."About real life and reel lives". The Times of India. October 2010. Retrieved 9 March 2014.
- ^ "Anant Nag: Being a politician is tougher than acting a politician". Deccan Chronicle. 4 March 2020.
- ^ "I was influenced by English cinema and absurd plays: Anant Nag". The Hindu. 3 March 2020.
- ^ "I am an untrained actor". The Hindu. 7 June 2016.
- ^ "'An actor should be like water, ego-less':An interview with Kannada icon Anant Nag". Scroll. 8 October 2017."'An actor should be like water, ego-less':An interview with Kannada icon Anant Nag". Scroll. 8 October 2017.
- ^ "'An actor should be like water, ego-less':An interview with Kannada icon Anant Nag". Scroll. 8 October 2017."'An actor should be like water, ego-less':An interview with Kannada icon Anant Nag". Scroll. 8 October 2017.
- ^ "23rd National Film Awards" (PDF). iffi.nic.in. 26 May 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 9 March 2014 रोजी पाहिले.
- ^ "How Shankar Nag's Malgudi Days came to life". Deccan Herald. 10 May 2020.
- ^ "Godhi Banna Sadharana Mykattu: Out to steal your heart". The Hindu. 3 June 2016.
- ^ "Movie Review: Godhi Banna Sadharana Maikattu". Filmfare. 6 June 2016.
- ^ "Four Kannada experiments run to packed houses". The Hindu. 8 June 2016.
- ^ "About real life and reel lives". The Times of India. October 2010. 9 March 2014 रोजी पाहिले."About real life and reel lives". The Times of India. October 2010. Retrieved 9 March 2014.
- ^ "Anant Nag: Being a politician is tougher than acting a politician". Deccan Chronicle. 4 March 2020."Anant Nag: Being a politician is tougher than acting a politician". Deccan Chronicle. 4 March 2020.
- ^ "Chamrajpet Election and Results 2018, Candidate list, Winner, Runner-up, Current MLA and Previous MLAs". Elections in India. 2022-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Karnataka State Film Awards 2010–11 winners". The Times of India. 14 March 2013. 18 May 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "39th Annual Filmfare Kannada Best Actor Actress : santosh : Free Down…". archive.org. 8 February 2017. 8 February 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अनंत नाग चे पान (इंग्लिश मजकूर)