अनंत तिबिले
अनंत तिबिले हे कोल्हापूरमध्ये राहणारे एक मराठी लेखक आहेत.ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील कादंबरी लेखन आणि रहस्यमय कथांच्या माध्यमातून मराठी सारस्वतांत वेगळी मुद्रा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक अनंत दत्तात्रय तिबिले (वय ८०) यांचे निधन झाले. गेले तीन दिवस त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी बारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पंचगंगा स्मशानभूमी येथे दुपारी ३.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या रूपाने एक व्रतस्थ लेखक हरपला अशी भावना साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे.तिबिले यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील त्यांच्या २९१ कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. २५० रहस्यकथा त्यांनी लिहिल्या असून वाचकप्रिय लेखक म्हणून त्यांची ओळख होती. मार्च १९७८ मध्ये त्यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘शापित राजहंस’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराज यांची पराक्रमी आणि तेजस्वी कारकीर्द तिबिले यांनी उलगडून सांगत मराठी वाचकांचे लक्ष वेधले. छत्रपती शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी अशा इतिहासकालीन व्यक्तीरेखांचे चित्रण करत वाचकांना वेगळी अनुभूती दिली. त्यांच्या ‘बळी’कादंबरीवर ‘मळवट भरला रक्तानं’ आणि ‘ज्वालामुखी’ कादंबरीवर ‘सत्ताधीश’ या सिनेमांची निर्मिती झाली. तिबिले हे मूळचे उत्तरेश्व पेठ येथील. १५ जून १९३४ मध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी नाट्यछटा लिहिल्या. क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी ठिकठिकाणी नोकरी केली. १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाले. गेली २७ वर्षे ते रत्नाप्पाण्णा कुंभारनगर (आरकेनगर) येथे वास्तव्यास होते. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ स्थापण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. आठ वर्षे त्यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्षपदही भूषविले होते. विविध सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार होता. शांत आणि मनमिळावू वृत्तीचे तिबिले यांनी आयुष्यभर लेखनाचा छंद जोपासला.
अनंत तिंबिले यांनी लिहिलेली पुस्तके
- अग्निदिव्य.
- अनपेक्षित.
- असेही एक समर....
- कुंती (कादंबरी)
- त्याची देही याची डोळा.
- मादी (कादंबरी)
- लाल हवेली.
- वादळ
- शापित राजहंस (संभाजी राजेंच्या जीवनावरील कादंबरी)
- सुकली बकुल फुले
- सौदामिनी
पुरस्कार आणि सन्मान
- तिबिले हे दक्षिण महाराष्ट्र सभेच्या एका मराठी साहित् संमेलनाचे अध्यक्ष होते.