अद्वैत वेदान्त
अद्वैत ही संज्ञा व संकल्पना गूढवाद, तत्त्वमीमांसा, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमध्ये आढळते. मानसशास्त्र व गूढवादात अद्वैताचा अर्थ व्यक्तीची आत्मजाणीव व व्यक्तीच्या जाणिवेतील घटक (चेतनेचे/जाणिवेचे विषय) यांच्यात अभेद असणे असा होतो. योगामध्ये याला विलिनता असे म्हणले जाते.
अद्वैत वेदान्त ही हिंदू तत्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. आद्य शंकराचार्यांनी या मताचा विशेष पुरस्कार केला आहे.