Jump to content

अदला बदली (चित्रपट)

अदला बदली
दिग्दर्शन ज्यूनिअर मेहमूद
पटकथाहेमंत एदलाबादकर
प्रमुख कलाकार



छाया मंगेश सावंत
पार्श्वगायनसचिन पिळगांवकर
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित २००८


अदला बदली हा २००६ साली प्रदर्शित झालेला भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे. ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, तेजा देवकर, आदिती भागवत, विजू खोटेआनंद अभ्यंकर ह्यांसारखं कलाकार आहेत.

कलाकार

कथानक

राम (विजू खोटे) आणि श्याम (आनंद अभ्यंकर) हे दोघं श्रीमंत भाऊ व बांधकाम कंपनीचे व्यवसाय भागीदार असतात जे निसर्ग विरुद्ध पालनपोषण ह्यावर विरुद्ध विचार करतात. रामच्या म्हणण्यानुसार माणसाची हुशारी त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते तर श्यामचा ह्या गोष्टीवर विश्वास असतो की परिस्थिती काहीही असो पण ती माणसाचे रक्तातील गुण नाही बदलू शकत. एकमेकांना चुकीचे सिद्ध करण्याचा निर्धाराने हे दोघं मानवी प्रवृत्तीवर वास्तविक जीवनाचा अनुभव घेण्याच्या पैजेसाठी एकमेकांना आव्हान देतात. त्याचवेळेला राम आणि श्याम त्यांचा व्यवस्थापकीय संचालक - सुसंस्कृत आणि सुशिक्षित वैभव जोशी (सचिन पिळगांवकर) ज्याच्या साखरपुडा त्यांची भाची प्रीती (आदिती भागवत) हिच्याशी झालेला आहे - व आरामशीर आणि हुशार भिकारी चंद्रकांत ऊर्फ चंदू (अशोक सराफ) यांच्यात झालेल्या भेटीचे साक्षीदार बनतात. त्याच्याकडून आपण लुटले जातोय असा समज असलेल्या वैभवच्या सांगण्यावरून चंदूला पोलीस अटक करून तुरुंगात पाठवतात. राम आणि श्याम सामाजिक पदानुक्रमाच्या विरुद्ध बाजूंना ह्या दोन माणसांचे जीवन बदलण्याचा व त्याच्या परिणामांचे निरीक्षण करण्याचा निर्णय घेतात.

त्यांच्या ध्येयाचा पहिला भाग म्हणुन राम आणि श्याम च्या वेतनावरील कर्मचारी एस. जकातदार (श्रीधर तानाजी पाटील) हा वैभववर कंपनीतला चोर म्हणुन आरोप करतो. ह्याचे परिणाम म्हणुन वैभवला राम आणि श्यामच्या कंपनीमधून काढलं जातं, त्याची सगळी बँक खाती बंद पडतात, त्याच्या नोकर रॉबर्ट (विकास समुद्रे) हा त्याला त्याच्या स्वतःच्याच घरात प्रवेश नाकारतो व प्रीती सरला (तेजा देवकर) हिला भेटल्यानंतर तिचा साखरपुडा वैभवशी तोडून टाकते. सारला ही एक भ्रष्ट मुलगी असते जिला ती वैभवच्या हाताखाली काम करणारी वेश्या आहे व त्याचं मूल आता तिच्या पोटात वाढतय असं प्रीतीसमोर भासवायला जकातदारने लाच दिलेली असते. दुसरा कुठलाही पर्याय समोर न दिसून असहाय्य वैभव सरलाकडे मदत मागतो आणि ती आश्चर्यचकितपणे त्याची दुर्दशा कळल्यानंतर बहिणीची माया दाखवते व वैभवला आपल्या गरिबीच्या जगातल्या घरात आश्रय देते.

दुसरीकडे, राम आणि श्याम परोपकारी असल्याचे भासवून चंदूसाठी जामीन देतात, त्याला वैभवच्या पूर्वीच्या नोकरीवर बसवतात आणि त्याला वैभवच्या घराचा वापर करण्यास परवानगी देतात. यश मिळवण्यासाठी आपली भीक मागण्याची हुशारी वापरून चंदू कमी वेळात व्यवसायात पारंगत होतो व चांगल्या पद्धतीने वागू लागतो. शिवाय, वैभवला हे कळून खूप त्रास होतो की त्याला अपमानित केल्यावर प्रीतीचा नवा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून चंदू आहे. तो प्रीतीला भेटण्याचा आणि स्वतःबद्दलचा गैरसमज दूर करण्याचा अनेक वेळा प्रयत्न करतो परंतु त्याला यश मिळत नाही. ह्या दोन माणसांच्या आयुष्यात खूप मोठं वळण येतं जेव्हा वैभवला माणुसकीची खरी किंमत कळते तर चंदूला उच्च-समाजात माणुसकीची कमी जाणवते.

दिवाळीच्या निमित्ताने राम आणि श्यामच्या कंपनीच्या सक्सेस पार्टीच्या वेळी, वैभव आचाऱ्याच्या वेशात कार्यक्रमाच्या आत घुसतो जेव्हा तो जाणूनबुजून रामचं पाकिट त्याच्या खिशातून चोरतो व चंदूवर चोरीचा आरोप करण्याच्या प्रयत्नात ते त्याच्या डेस्कवर ठेवतो आणि पळून जाण्यासाठी बंदूक दाखवतो. नंतर, चंदू राम आणि श्याम ह्यांना पार्टीबाहेर त्यांच्या पैजेवर व रामने श्यामकडून घेतलेल्या दहा रुपयांच्या दाव्यावर चर्चा करताना ऐकतो. हे कळून धक्का बसल्याने चंदू वेळ वाया न घालवता वैभवचा शोधून काढतो पण त्याने आत्महत्येच्या प्रयत्नात प्रमाणा बाहेर औषधाच्या गोळ्या घेतलेल्या असतात. चंदू, सरला आणि रॉबर्ट त्याची प्रकृती सुधारतात आणि त्याला त्याच्या घरी घेऊन येतात. तिथे असताना, वैभवलाही धक्का बसतो जेव्हा चंदू राम आणि श्यामचा त्या दोघांची जागा समाजात बदलण्याबद्दलचा डाव उघड करतो. राम आणि श्याम केवळ एका पैजेसाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत हे जाणवून वैभव त्या दोघांना त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने धडा शिकवून एकसारखे गुण मिळवण्याच्या आशेने चंदूशी हातमिळवणी करतो.

उल्लेखनीय

सचिन पिळगांवकरअशोक सराफ ही मराठीतील सुपरहिट जोडी, मंगेश सावंत यांचं छायाचित्रण, सचिन व आदिती भागवत यांच्यावर चित्रित केलेलं 'राजसा सांग ना' हे गाणं, अशोक सराफ यांचं विनोदांचं टायमिंग आणि विजू खोटेआनंद अभ्यंकर यांचा अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.

बाह्य दुवे