Jump to content

अथीना

अथेनाचा पुतळा

अथेना किंवा अथीना, ही ग्रीक पुराणांनुसार बुद्धिचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता आहे. ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराचे ग्रामदैवत अथेना आहे. घुबड ही या देवतेची निशाणी आहे.

अथेना ही झ्यूसची कन्या मात्र ती आईविना जन्मली.[] दुसऱ्या एका कथेनुसार झ्यूसची पहिली पत्नी मेटीस व झ्यूस यांची ही कन्या. आपली पत्नी आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली पुत्रास जन्म देईल या भीतीने, झ्यूसने अथेनाला खाऊन टाकले. पुढे हिफीस्टसने कुऱ्हाडीच्या घावाने झ्यूसचे डोके फोडून त्यातून अथेनाला बाहेर काढले. अथेना ही मुख्यत्वे अथेन्स शहराची, आणि सामान्यत: सर्व ग्रीक शहरांची संरक्षणदेवता आहे. ती कलाकौशल्याची आश्रयदात्री आहे. ती सूतकताई आणि विणकाम यांचीही देवता आहे. पावा किंवा बासरी हे वाद्य तिनेच शोधून काढले असे म्हणतात. तिचे सौंदर्य पाहणारा भयचकित होतो.

अथेनाच्या मूर्तीत ती नेहमी सुंदर पण सशस्त्र दाखविली जाते. तिच्या ढालीवर गॉरगॉन या राक्षसिणीचे डोके दाखविलेले असते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Athena". ब्रिटानिका (इंग्रजी भाषेत) (वेब ed.). एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका. ३० ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवतेझ्यूसहिअरापोसायडनडीमिटरहेस्तियाऍफ्रडाइटी अपोलोऍरीसआर्टेमिसअथेनाहिफॅस्टसहर्मीस
रोमन दैवतेज्युपिटरजुनो नेपच्यूनसेरेसव्हेस्टाव्हीनसमार्सडायानामिनर्व्हाव्हल्कनमर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.